ब्रेकिंग न्यूज
⚡ शाळा सुटल्यावर चौथीच्या मुलींना थांबवायचा, कपडे काढून डान्स करायचा अन्…, बीडमध्ये शिक्षकाचं भयंकर कृत्य, … ✦ ⚡ शाळा सुटल्यावर चौथीच्या मुलींना थांबवायचा, कपडे काढून डान्स करायचा अन्…, बीडमध्ये शिक्षकाचं भयंकर कृत्य, … ✦ ⚡ शिवाजी पार्कची दोस्ती, ‘नटसम्राट’ पाहून ढसाढसा रडला होता 1983 च्या वर्ल्ड कपचा हिरो! नाना पाटेकरांच्या क्रि… ✦ ⚡ शेताच्या बांधावरून थेट रुपेरी पडद्यावर! वेगावच्या अजय बदकी यांची ‘हुंकार’मधून दमदार एन्ट्री! ✦ ⚡ शेतकरी ते यशस्वी उद्योजक, नाशवंत भाजीपाल्याने पालटलं नशीब, आता महिन्याला 2 लाखांची कमाई ✦ ⚡ दुष्काळात बीडच्या शेतकऱ्यानं करून दाखवलं, 500 रुपयांच्या खर्चात मिळवलं तब्बल 32 क्विंटल सोयाबीनचे उत्पादन, … ✦ ⚡ लेकीच्या सुखासाठी कर्ज काढलं, पण जावई निघाला…, लग्नानंतर 4 महिन्यांत सगळं संपलं, संजनाचा आईला शेवटचा फोन … ✦ ⚡ Pawanraje Nimbalkar Murder Case : पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाला नवं वळण! पद्मसिंह पाटलांचा पाय खोलात? CB… ✦ ⚡ CRIME : फेसबूक LIVE सुरू असताना थरारक हत्याकांड! मेडिकल स्टोअरबाहेर पेटला वाद अन् ‘स्टिंग ऑपरेशन’ करताना झा… ✦ ⚡ Success Story : शेती करावी तर अशी, तीन पिकातून बीडच्या शेतकऱ्याचं पालटलं नशीब, वर्षाला 8 लाख कमाई, Video
SP News Maregaon

कागदावर उगवल्या फळबागा!:रेकाॅर्डवर झाडांची संख्या वाढवून 51 कोटी लाटण्याचा डाव, 10 वर्षे जुन्या नोंदवहीत खाडाखोड, 32 जणांवर गुन्हा

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


तलावाचे काम आणि भूसंपादन पूर्ण झालेल्या पाचोरा तालुक्यातील अटलगव्हाण, पिंपळगाव आणि कोल्हे या तीन गावांत तब्बल दहा वर्षांनी तलावाच्या जागेवर कागदोपत्री फळबागा दाखवण्यात आल्या. एक माजी सरपंच आणि वकिलाने प्रकल्पग्रस्तांना भेटून वाढीव मोबदल्याचा कट रचला. जिल्हाधिकारी कार्यालयातील जुन्या रेकॉर्डमध्ये काही फळझाडांच्या संख्येत शून्य वाढवले तर काही आकड्यांची फेरफार करून 51 कोटी 17 लाख रुपयांचेबोगस प्रस्ताव न्यायालयात सादर केले. थेट न्यायालयाचीच फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाल्याने 32 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी वापरलेल्या एका गर्द काळ्या शाईच्या पेनमुळे हा घोटाळा उघड झाला आहे. या महाघोटाळ्याप्रकरणी जळगावच्या जिल्हापेठ पोलिस ठाण्यात एकापाठोपाठ एक तब्बल 17 स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्याचा मुख्य मास्टरमाइंड वकील किशोर बाबूराव पाटील आणि त्याला साथ देणारा पाळधी (ता. जामनेर) गावचा माजी सरपंच प्रशांत बाविस्कर हे या प्रकरणातील प्रमुख सूत्रधार आहेत. या दोघांसह एकूण 32 संशयित आरोपींनी हा भूसंपादनाचा मोबदला लाटण्याचा प्रयत्न केला. कागदावर झाडांची लागवड; काळ्या शाईने उघड जुन्या सरकारी कागदपत्रांवर काळ्या पेनाने आकडे खोडून आणि नवीन संख्या लिहून मूळ निवाड्यात नसलेली चक्क 40 ते 50 आंब्याची, शेकडो डाळिंबाची झाडे कागदावर वाढवली. एका गटामागे 76 लाख ते दीड कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी लाटण्याची ही पूर्वतयारी होती. आरोपींनी वापरलेल्या एका गर्द काळ्या शाईच्या पेनमुळे हा घोटाळा उघड झाला आहे. या महाघोटाळ्याप्रकरणी जळगावच्या जिल्हापेठ पोलिस ठाण्यात एकापाठोपाठ एक तब्बल 17 स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्याचा मुख्य मास्टरमाइंड वकील किशोर बाबूराव पाटील आणि त्याला साथ देणारा पाळधी (ता. जामनेर) गावचा माजी सरपंच प्रशांत बाविस्कर हे या प्रकरणातील प्रमुख सूत्रधार आहेत. या दोघांसह एकूण 32 संशयित आरोपींनी हा भूसंपादनाचा मोबदला लाटण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणातील वाढीव मोबदल्याची कायदेशीर मुदत 2015 मध्येच संपली होती. मात्र, आपली मुदतबाह्य प्रकरणे पुन्हा जिवंत करण्यासाठी मुख्य आरोपी ॲड. किशोर पाटील व टोळीने थेट उपजिल्हाधिकारी कार्यालयाचे बनावट लेटरहेड छापून घेतले. विशेष भूसंपादन अधिकारी जयश्री माळी यांच्या पदनामाशी साधर्म्य असलेला बनावट शिक्का तयार केला. अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून, हे अर्ज 26 ऑगस्ट 2015 या मागच्या तारखेत कार्यालयात जमा झाल्याचा खोटा बनाव आवक नोंदवहीत कोणतीही नोंद नसताना केला गेला. या बनावट फाइल्स घेऊन त्यांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली. आमचे अर्ज गेली 10 वर्षे जिल्हाधिकारी कार्यालयात धूळखात पडले होते, असा खोटा युक्तिवाद करून त्यांनी कोर्टाचीही दिशाभूल केली व कोटींच्या वाढीव मोबदल्याचे आदेश मिळवले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर