ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

धान्य खरेदी केंद्र संख्या वाढवा; शेतकरी राजा ग्रुपची मागणी:पातूर- मालेगाव महामार्गावर तहसील कार्यालयासमोर रास्ता रोको‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शासकीय धान्य खरेदी केंद्राची संख्या वाढवा, सोयाबीन खरेदी करताना नियम व अटी यात बदल करा, यासह अन्य मागण्यांसाठी शेतकरी राजा ग्रुपने आंदोलन केले. पातूर- मालेगाव महामार्ग तहसील कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन करीत शेतकऱ्यांनी मागण्या लावून धरल्या. यंदा आधीच खरीप हंगामात सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले. दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात हमीभावाने सोयाबीनची खरेदी सुरू होते. मात्र यंदा उशीरा खरेदी प्रक्रिया सुरू झाली. खरिपात प्रचंड नुकसान झाल्याने शासकीय खरेदी लवकर सुरू होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना होती. शासनाने यंदा प्रती क्विंटल ५ हजार ३२८ एवढा हमीभाव निश्चित केला आहे. सध्या सोयाबीन काढणी अंतिम टप्प्यात आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांनी खुल्या बाजारात सोयाबीनची विक्री करीत आहे. खुल्या बाजारात ४ हजार ते ४४७० एवढा भाव भाव मिळाला. परिणामी क्विंटलमागे सुमारे दीड हजारांचा तोटा शेतकऱ्यांना सहन करावा लागला. दरम्यान पातूर तालुक्यातील शेतकरी अतिवृष्टीमुळे संकटात असून, सर्व खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी करीत आंदोलन करण्यात आले. यावेळी सहाय्यक निबंधक ज्योती मलिये तथा नायब तहसीलदार कातखेडे यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनात रवी सोनवणे, शिवसंग्राम संघटना जिल्हाध्यक्ष दिलीप परनाटे, सामाजिक कार्यकर्ते नीलेश कापकर, गोपाल पजई, भगवंत काळदाते, श्रावण सोनवणे, गणेश टाले, प्रल्हाद नीलखन, दिनकर लाडकर, शालिग्राम राऊत, महादेव अडकणे, गजानन राखोंडे, मनीष देशमुख, पांडुरंग कुरई, संतोष देशमुख,प्रेम पजइ,मंगेश गाडेकर, गजानन झोडपे, रामकिशन ताजने,गोपाल सनोणे,दशरथ सदर,रामकृष्ण पाटील, विकास कीर्तने,बाळू ढोकणे आदींसह बहुसंख्य शेतकऱ्यांची उपस्थिती होती. अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पातूरचे ठाणेदार हनुमंत डोपेवाड यांच्यासह हिंमतराव डिगोळे तैनात होते. हमी भावाने सोयाबीन, मूग, उडीदची खरेदी प्रक्रिया राबवण्याबाबतचा आदेश सहकार, पणन व वस्त्रोउदयोग विभागाने जारी केला होता. केंद्र शासनाने सोयबीनसाठी १८ लाख ५० हजार ७०० मेट्रिक टन, मूग ३३ हजार मेट्रिक टन व उडीत ३ लाख २५ हजार ६८० मेट्रिक टन खरेदीला मंजुरी दिली आहे. सोयाबीनची शासकीय आधारभूत किमतीत नोव्हेंबरमध्ये शासनाकडून खरेदी सुरू होणार असल्याचा दावा सत्ताधारी भाजपकडून काही दिवसांपूर्वी करण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांनी खुल्या बाजारात कमी भावाने सोयाबीन विक्री करू नये, असे आवाहन आमदार रणधीर सावरकर यांनी केले होते. सोयाबीनची शासकीय खरेदी आधारभूत किमतीमध्ये व्हावी, यासाठी शेतकरी पुत्रांनी २४ ऑक्टोबर पणन महासंघाच्या जिल्हा कार्यालयात झोपा काढा आंदोलन केले होते. खरेदी प्रक्रिया सुरु करण्यासाठी निद्रिस्त असलेल्या सरकारी यंत्रणांना जागे करण्यासाठी आंदोलन करण्यात आले. पातूर तालुक्यात नाफेडचे शासकीय धान्य खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. मात्र तालुक्यात फक्त एकच खरेदी केंद्र आहे. या खरेदी केंद्रावर आजपर्यंत २३०० ते २४०० शेतकऱ्यांची नोंद झालेली असून एका खरेदी केंद्रावर पातूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा माल मोजणी अशक्य दिसून येत आहे. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी नाफेडचे शासकीय सोयाबीन धान्य खरेदी केंद्राची संख्या वाढवण्याची अत्यंत आवश्यकता आहे. गतवर्षी तालुक्यात शासकीय नाफेड खरेदी केंद्राची संख्या ही चार ते पाच केंद्र चालू होते. मात्र त्यानंतरही शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी जून महिन्यापर्यंत सुरु होती. काही शेतकरी सोयाबीन खरेदी पासून वंचित राहिले. यावर्षी सोयाबीन खरेदी करताना शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचे नियम व अटी लावण्यात येऊ, नयेत, अशी मागणी आंदोलकांनी केली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर