ब्रेकिंग न्यूज
⚡ शाळा सुटल्यावर चौथीच्या मुलींना थांबवायचा, कपडे काढून डान्स करायचा अन्…, बीडमध्ये शिक्षकाचं भयंकर कृत्य, … ✦ ⚡ शाळा सुटल्यावर चौथीच्या मुलींना थांबवायचा, कपडे काढून डान्स करायचा अन्…, बीडमध्ये शिक्षकाचं भयंकर कृत्य, … ✦ ⚡ शिवाजी पार्कची दोस्ती, ‘नटसम्राट’ पाहून ढसाढसा रडला होता 1983 च्या वर्ल्ड कपचा हिरो! नाना पाटेकरांच्या क्रि… ✦ ⚡ शेताच्या बांधावरून थेट रुपेरी पडद्यावर! वेगावच्या अजय बदकी यांची ‘हुंकार’मधून दमदार एन्ट्री! ✦ ⚡ शेतकरी ते यशस्वी उद्योजक, नाशवंत भाजीपाल्याने पालटलं नशीब, आता महिन्याला 2 लाखांची कमाई ✦ ⚡ दुष्काळात बीडच्या शेतकऱ्यानं करून दाखवलं, 500 रुपयांच्या खर्चात मिळवलं तब्बल 32 क्विंटल सोयाबीनचे उत्पादन, … ✦ ⚡ लेकीच्या सुखासाठी कर्ज काढलं, पण जावई निघाला…, लग्नानंतर 4 महिन्यांत सगळं संपलं, संजनाचा आईला शेवटचा फोन … ✦ ⚡ Pawanraje Nimbalkar Murder Case : पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाला नवं वळण! पद्मसिंह पाटलांचा पाय खोलात? CB… ✦ ⚡ CRIME : फेसबूक LIVE सुरू असताना थरारक हत्याकांड! मेडिकल स्टोअरबाहेर पेटला वाद अन् ‘स्टिंग ऑपरेशन’ करताना झा… ✦ ⚡ Success Story : शेती करावी तर अशी, तीन पिकातून बीडच्या शेतकऱ्याचं पालटलं नशीब, वर्षाला 8 लाख कमाई, Video
SP News Maregaon

हिंगोलीत चोरट्यांचा हैदोस!:तिरुपती नगर परिसरात घरांची ‘रेकी’ करून दोन दुचाकी पळवल्या; सीसीटीव्ही फुटेज समोर

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


हिंगोली शहरातील तिरुपती नगर भागात चोरट्यांनी दोन दिवसाची वाहने पळविल्याची घटना घडली आहे. यावेळी चोरट्यांनी परिसरातील घरांची रेकी केल्याचे सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसून येत आहे हिंगोली शहरातील तिरुपती नगर भागामध्ये शुक्रवारी तारीख 26 पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास पाच चोरट्यांनी प्रवेश केला. तोंडाला रुमाल बांधून आलेल्या चोरट्यांनी पायाचा आवाज येऊ नये यासाठी पायातील चपला व बुट काढून हातात घेतली होती. या चोरट्यांनी परिसरातील बहुतांश घराची रेकी केली. चोरट्यांनी काही घरांच्या संरक्षण भिंतीवरून उड्या मारून आत प्रवेश केला. मात्र कुठेही चोरी करण्यात चोरट्यांना संधी मिळाली नाही. यावेळी चोरट्यांनी तिरुपती नगरातील रहिवासी असलेले विजय लोथे यांच्या घराजवळ उभ्या केलेल्या दोन दुचाकी पळविल्या. शुक्रवारी सकाळी लोथे यांनी पाहणी केली असता घरासमोरील दोन्ही दुचाकी पळविल्याचे दिसून आले. हिंगोली शहर पोलिस ठाण्याची संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. हिंगोली शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकूर, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय मार्के, जमादार अशोक धामणे, गणेश लेकुळे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. यावेळी चोरटे तिरुपती नगर परिसरात फिरत असल्याचे दिसून आले. चोरट्यांनी तोंडाला रुमाल बांधल्यामुळे त्यांचे चेहरे स्पष्टपणे ओळखू येत नसल्याचे सांगण्यात आले आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतली असून त्यावरून आता चोरट्यांची ओळख पटविण्याची प्रयत्न सुरू केले आहेत. याप्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात अद्याप पर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही.दरम्यान या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी रात्रीच्या वेळी परिणामकारक गस्त सुरू करावी अशी मागणी नागरीकांतून केली जात आहे

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर