ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

सिंहगडावर आलेल्या जोडप्याचा भीषण अपघात:दुचाकी खोल दरीत कोसळली; ‘पाया पडते लवकर घेऊन चला’ म्हणत तरुणीची मदतीची याचना

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पु्ण्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या सिंहगड किल्ल्याच्या घाट रस्त्यावर शनिवारी सायंकाळी एक दुचाकी दरीत कोसळून एक तरुण व तरुणी जबर जखमी झाले. दुचाकी चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती आहे. या अपघातानंतर जखमी तरुणी पाया पडते, मला लवकर दवाखान्यात घेऊन चला, अशी गयावया करताना दिसून आली. यासंबंधीच्या माहितीनुसार, पूजा चव्हाण व सौरव पासलकर अशी जखमी तरुण – तरुणीची नावे आहेत. हे दोघेही शनिवारी सिंहगड किल्ल्याच्या पर्यटनासाठी आले होते. किल्ला पाहिल्यानंतर सायंकाळी ते दुचाकीवरून खाली उतरत होते. ते सिंहगड घाटातील 11 हजार पॉईंट परिसरात आले असता तरुणाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी थेट रस्त्यालगतच्या खोल दरीत कोसळली. हा अपघात एवढा भीषण होता की, दोघेही दरीमध्ये खूप दूरवर फेकल्या गेले. त्यात ते गंभीर जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच वनविभाग, वन समितीचे कर्मचारी, स्थानिक नागरीक, आपत्ती व्यवस्थापन पथक व इतर पर्यटकांनी घटनास्थळी धाव घेतली. ज्या ठिकाणी अपघात घडला, ते ठिकाण अत्यंत खोल होते. जखमींपर्यंत पोहोचणे एक अवघड आव्हान होते. पण त्यानंतरही सर्वांनी एकदिलाने प्रयत्न करून अत्यंत दक्षतापूर्वक बचाव मोहीम राबवली. दोन्ही जखमींना दरीतून सुखरूप बाहेर काढले. या अपघातात तरुणाच्या डोक्याला गंभीर इजा झाली. तर तरुणीच्या पायाला जबर मार लागला. प्राथमिक तपासात तिचा पाय 2-3 ठिकाणी मोडल्याचे स्पष्ट झाले. पायात फ्रॅक्चर झाल्यामुळे तरुणीला जागेवर नीट बसताही येत नव्हते. ती वेदनाने अक्षरशः विव्हळत होती. पाया पडते मला लवकर रुग्णालयात घेऊन चला, अशी गयावया ती बचाव पथकातील कर्मचाऱ्यांना करत होती. त्यानंतर उपस्थितांनी तातडीने खासगी वाहनाच्या मदतीने त्यांना लगतच्या रुग्णालयात दाखल केले. तिथे दोघांचीही प्रकृती चांगली असल्याचे समजते. सिंहगडावर नेहमीच असते मोठी गर्दी दरम्यान, सिंहगड किल्ला हा पुण्यातील अत्यंत लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. तिथे दररोज मोठ्या संख्येने पर्यटक येथे भेट देतात. विशेषतः पावसाळा आणि सुट्टीच्या दिवशी घाट रस्त्यावर मोठी गर्दी होत असते. मात्र, घाटातील तीव्र वळणे, खोल दऱ्या आणि वेगाने वाहन चालवण्याच्या प्रकारांमुळे येथे वारंवार अपघात घडत असल्याचे समोर येते. यापूर्वीही सिंहगड घाट परिसरात अनेक अपघातांच्या घटना घडल्या असून प्रशासनाकडून पर्यटकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात येत असते. वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवणे, सुरक्षेचे नियम पाळणे आणि धोकादायक ठिकाणी सेल्फी किंवा स्टंट टाळणे आवश्यक असल्याचे स्थानिकांकडून सांगितले जात आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर