ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी समाज, कुटुंब, प्रशासनाने एकत्र यावे:सावित्रीआई फुले गौरव पुरस्कार सोहळ्यात पापळकर यांचे प्रतिपादन‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


प्रशासनाची शेतकरी सहाय्यक धोरणे, समाजाचा सहभाग आणि कुटुंबाचा पाठिंबा यामुळे शेतकरी आत्महत्या थांबवण्यात यश मिळवता येईल, असे प्रतिपादन सोशल फोरमच्या वतीने आयोजित करण्यात आलेला निशुल्क बी-बियाणे वाटप कार्यक्रम तसेच क्रांतिज्योती सावित्रीआई फुले गौरव पुरस्कार सोहळा दरम्यान पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांनी केले. आयोजित कार्यक्रमात पद्मश्री शंकरबाबा पापळकर, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानदा फणसे, सोशल युवा फोरमचे डॉ अभ्युदय मेघे, अविनाश सातव यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. प्रशासनाची शेतकरी सहाय्यक धोरणे, समाजाचा सहभाग आणि कुटुंबाचा पाठिंबा यामुळे शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी होऊ शकते, शेतकऱ्यांनी शेतीसोबतच गोपालन व बकरीपालनासारखे जोडधंदे स्वीकारून आर्थिक स्थैर्य मिळवावे, असे प्रतिपादन आयोजित कार्यक्रमात पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांनी केले. ज्ञानदा फणसे यांनी वर्धा सोशल फोरमच्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक करत पुरस्कार प्राप्त महिलांचे अभिनंदन केले. उपविभागीय कृषी अधिकारी वैशाली शिंदे यांनी शेतकऱ्यांना घन कपाशी लागवडीबाबत मार्गदर्शन करत पावसाची परिस्थिती लक्षात घेऊन पेरणीची घाई न करण्याचे आवाहन केले. यावेळी पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या अनाथालयातील अंध विद्यार्थिनी गांधारी हिने सादर केलेल्या गीताने उपस्थितांची मने जिंकली. तिचाही विशेष सन्मान करण्यात आला. यंदाही अनेक दानशूर व्यक्ती व कृषी विभागाच्या सहकार्याने शेतकरी कुटुंबांना मदतीचा हात देण्यात आला. जिल्हाभरातील सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी, शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी पुरोहित यांनी तर आभार प्रदर्शन श्याम परसोडकर यांनी केले. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी बी-बियाणे वाटप सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉ. चेतना सवाई, तबस्सुम आझमी, कांचन रघटाटे, अश्विनी रवी काळे यांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले गौरव पुरस्कार २०२६ प्रदान करण्यात आला. वर्धा सोशल फोरमचा आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी बी-बियाणे वाटपाचा हा उपक्रम अकराव्या वर्षात पदार्पण करत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर