ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

चायना मांजाचा वापर मानव, पशु-पक्ष्यांसाठी धोक्याचा:कृषी अधिकारी बोराळे यांचे आवाहन, चायना मांजा बंदीसाठी ‘स्नेहबंध’चा पुढाकार‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


चायना मांजा धारदार व घातक आहे. त्याचा वापर मानवी जीवन, पशु-पक्षी तसेच सार्वजनिक सुरक्षिततेसाठी गंभीर धोका ठरतो. पतंग उडवताना हाताला गंभीर इजा होण्यासह तुटलेला मांजा रस्त्यावर पडल्यास दुचाकीस्वार, पादचारी व लहान मुले अडकून अपघात होतात. मानवी जीवन, पशु-पक्षी आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी चायना मांजा पूर्णतः टाळणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी केले. मकरसंक्रांती सणाच्या पार्श्वभूमीवर चायना मांजामुळे होणारे संभाव्य अपघात, जीवितहानी व पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी स्नेहबंध सोशल फाउंडेशनच्या वतीने चायना मांजा बंदी जनजागृती पोस्टरचे अनावरण करण्यात आले. त्यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बोराळे बोलत होते. यावेळी स्नेहबंधचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे उपस्थित होते.बोराळे म्हणाले, चायना हा मांजा वीज तारांवर अडकल्यास शॉर्टसर्किट होऊन आग लागण्याच्या व मालमत्तेच्या नुकसानीच्या घटनाही घडतात. चायना मांजा हा केवळ बेकायदेशीरच नाही तर जीवघेणाही आहे. मानवी जीवन, पशु-पक्षी आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी चायना मांजा पूर्णतः टाळणे आवश्यक आहे, असे बोराळे म्हणाले. स्नेहबंधचे अध्यक्ष डॉ. शिंदे म्हणाले, चायना मांजामुळे पशु-पक्ष्यांच्या जीविताला मोठा धोका निर्माण होत असून पर्यावरणाची अपरिमित हानी होत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या चायना मांजा बंदीच्या निर्णयाला नागरिकांनी सहकार्य करावे व सुरक्षित व पर्यावरणपूरक सण साजरा करावा.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर