ब्रेकिंग न्यूज
लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक IND vs WI : भारताविरुद्ध वेस्ट इंडिजची टीम जाहीर! 3 खुंखार खेळाडू घालणार तांडव; 30 वर्षाच्या वादळी खेळाडूचा… घराला एकच दरवाजा, कामे आटोपून झोपली महिला, शेजाऱ्यानं मध्यरात्री पाहिलं, तर…, सांगली हादरलं! गांडूळ खत निर्मितीचा व्यवसाय केला यशस्वी, आता वर्षाला होतीये 7 लाख रुपयांची उलाढाल, सांगितला यशाचा मंत्र नागपुरात सर्वात लांब उड्डाणपूल, CM फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन, पुलाची वैशिष्ट्ये काय? VIDEO
SP News Maregaon

मुलांनी 4 हजार बिजांची “सीड बँक’ केली तयार:निसर्गाच्या संवर्धनासाठी विद्यार्थ्यांनी घालून दिला एक अनोखा आदर्श‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


चार भिंतींच्या पलीकडचे शिक्षण घेत अकोल्यातील विद्यार्थ्यांनी निसर्गाच्या संवर्धनासाठी एक अनोखा आदर्श घालून दिला आहे. यंदाच्या उन्हाळ्याच्या सुटीत विद्यार्थ्यांनी जवळपास ४ हजार बीजांचे संकलन केले आहे. विद्यार्थ्यांनी गोळा केलेली ही “सीड बँक’ नुकतीच सामाजिक वनीकरण विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली. या उपक्रमात राजेश्वर कॉन्व्हेंट, जुने शहर, सन्मित्र पब्लिक स्कूल, किड्स पॅराडाईज स्कूल, मेडिकल अभिजित फार्म अँड कॉस्मेटिक, वंडर किड्स प्री स्कूल, शिवशंकर विद्यालय, उरळ आदींच्या विद्यार्थ्यांनी तसेच तिक्ष्णगत मल्टिपर्पज वेल्फेअर सोसायटी, सम्यक संबोधी संस्था आणि प्रदीप किडीले यांनी महत्वाची भूमिका बजावली. या मोहिमेत विविध शाळांमधील शेकडो विद्यार्थ्यांचा सहभाग उत्साह वाढवणारा होता, असे मानव वन्यजीव रक्षक तथा स्पर्धेचे आयोजक अमोल सावंत म्हणाले. बीज संकलनानंतर सामाजिक वनीकरण विभाग, निसर्गकट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने “बीज सम्राट व साम्राज्ञी’ आणि निसर्ग मित्रांचा कौतुक सोहळा घेण्यात आला. यावेळी उपस्थितांनी पृथ्वीच्या रक्षणाची सामूहिक प्रतिज्ञाही घेतली. कार्यक्रमात तिक्ष्णगत मल्टिपर्पज वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष डॉ. सुगत वाघमारे यांनी ग्लोबल वॉर्मिंगच्या धोक्यांवर बोट ठेवले. तसेच सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी रोहित चोबे यांनी विद्यार्थ्यांनी निसर्गाकडून जगायला शिकले पाहिजे, असा संदेश दिला. उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रदीप अवचार, निसर्गकट्टाचे अध्यक्ष ॲड. शेख अजीम, संदिप वाघडकर, राहुल ओईंबे यांचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांचा “बीज सम्राट, साम्राज्ञी’ म्हणून गौरव बीज संकलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, शैक्षणिक साहित्य देऊन गौरवण्यात आले. यात प्रथम क्रमांक अन्विश मसाळकर, द्वितीय देवांश पाचुरकर, तृतीय यज्ञेश फाले, चतुर्थ कोमल गोंड, पाचवा अर्णव देवकर तसेच सोनाक्षी गव्हाळे, माही दामोदर, भाग्यश्री होरे, साळवी जोशी, धवल देठे, स्वरा सुरवाडे, युवराज भगत, ईशान राऊत, अनन्या काळबेंडे, शंतनु काळबेंडे, प्रफुल्ल डोंगरे, विराज टाले, देवांशू झोलके, सई भाजीपाले, वल्लभ भाजीपाले आणि वेदांत भोजापुरे यांना सन्मानित करण्यात आले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर