ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

कत्तलीसाठी आणलेल्या 7 गोवंश जनावरांची सुटका:पैठण एमआयडीसी पोलिसांची ढोरकीन शिवारात धडक कारवाई

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


एमआयडीसी पैठण पोलिसांनी मंगळवारी ढोरकीन शिवारात धडक कारवाई करत कत्तलीसाठी आणून डांबून ठेवण्यात आलेल्या तब्बल सात गोवंश जनावरांची सुटका केली. सुमारे 2 लाख 25 हजार रुपये किंमतीच्या या जनावरांना मृत्यूच्या दारातून बाहेर काढत एमआयडीसी पैठण पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून परिसरात या कारवाईची जोरदार चर्चा सुरू आहे. एमआयडीसी पैठण पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी पैठण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक ईश्वर जगदाळे यांना ढोरकीन शिवारातील एका शेतात गोवंश जनावरे कत्तलीसाठी आणून ठेवण्यात आल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक ईश्वर जगदाळे यांनी वेळ न दवडता विशेष पथक तयार करून संबंधित ठिकाणी छापा टाकला. ढोरकीन शिवारातील इलियास अब्दुल शेख यांच्या शेतात पोलिसांनी धाड टाकली असता सात गोवंश जनावरे बांधून ठेवलेली आढळून आली. पोलिसांनी तत्काळ जनावरांची सुटका करत त्यांना सुरक्षित ताब्यात दिले. या प्रकरणी इलियास शेख यास ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या संपूर्ण कारवाईत सहाय्यक पोलिस निरीक्षक ईश्वर जगदाळे यांनी दाखवलेली तत्परता आणि नियोजन विशेष ठरले. गोपनीय माहितीची अचूक पडताळणी, तातडीने पथकाची उभारणी आणि धाडसी छापा यामुळे संभाव्य अवैध कत्तल रोखण्यात पोलिसांना यश आले. पोलिस अधीक्षक प्रकाश जाधव, अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत स्वामी आणि उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या मोहिमेत पोलिस अंमलदार राहुल मोहतमल, ज्ञानेश्वर भवर, अमित घोडके, कृष्णा उगले तसेच होमगार्ड श्रीकांत त्रिभुवन, विष्णू शिंदे, किरण वाल्हेकर आणि वाल्मिक घोंगडे यांनी सक्रिय सहभाग घेतला. एमआयडीसी पैठण पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे अवैध गोवंश कत्तल प्रकरणांवर पोलिसांचा वचक अधिक मजबूत झाल्याचे बोलले जात आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर