ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

छत्रपती संभाजीनगरचा महापौर आज सायंकाळी ठरणार- बावनकुळे:म्हणाले- शिवसेनेला उपमहापौरपद द्यायचे का नाही यावर चर्चा सुरू, मुंबईत महायुतीमध्ये पदांचे वाटप

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


छत्रपती संभाजीनगरच्या महापौरपदाबाबत स्थानिक नेत्यांचे एकमत जरी होत नसेल तरी त्यासाठी काही अडचण नाही. 2-3 नावे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे पाठवण्यात आलेली आहेत. आज सायंकाळी राज्याच्या कोअर कमिटीची बैठक होईल आणि त्यामध्ये मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष निर्णय घेतील, फार काही वाद नाही, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. 2-3 नावे आहेत त्यामुळे काहीच अडचण नाही. हा निर्णय घेण्यासाठी 5 मिनिटाच्यावर वेळ लागणार नाही. योग्यवेळी योग्य निर्णय होईल. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, शिवसेनेला उपमहापौरपद द्यायचे का नाही यावर चर्चा सुरू आहे. आमचे प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री आणि आम्ही सर्व जण सायंकाळी एका बैठकीमध्ये हे फायनल करणार आहोत. कुणी दिवा स्वप्न पाहू नये. तर अंजली दमानियांनी केलेल्या आरोपांवर आता काय बोलावे हे असे बोलणं आपली संस्कृती नाही असेही त्यांनी म्हटले आहे. कोंढवा प्रकरणातील ‘ती’ बातमी निराधार चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, पार्थ पवार यांच्याबद्दल मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी जी बातमी छापून आली आहे ती निराधार आहे. आतापर्यत अहवालच सरकारकडे आला नाही. त्यामुळे कशा बातम्या येतात लोकांना कसे गोंधळात टाकतात. माध्यमांना सुद्धा माझी विनंती आहे की अशा गंभीर प्रकरणात लेख किंवा बातम्या देऊन जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करू नये, 8 दिवसांमध्ये या प्रकरणाचा अंतिम अहवाल माझ्याकडे येणार आहे. उबाठाने किमान नगरसेवक तरी सांभाळावे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, उबाठाचे नगरसेवक सांभाळणे त्यांची काम आहे, त्या नगरसेवकांचे मतदान कुठे करायचे म्हणून ते मुंबईत महापौर पदाची निवडणूक लढवत आहेत. त्यांची मते घेऊन ते बसतील. आमदार त्यांनी सांभाळले नाही किमान नगरसेवक सांभाळतील असा टोला त्यांनी उबाठाला लगावला आहे. मुंबईत आम्ही युती करत निवडणूक लढवली त्यानुसारच तिथे पदाचे वाटप होणार आहे. भाजप ज्या 14 ठिकाणी वेगळी लढली आहे त्यापैकी काही ठिकाणी पदाधिकारी बसवण्यासाठी महायुती होत आहे. ज्या ठिकाणी महायुती तिथे सोबत सत्तेत बसणार जिथे महायुती नव्हती तिथे भाजप निर्णय घेत आहे. संजय राऊत हे जनतेचा अपमान करत आहेत, लोकशाहीचा विरोधात बोलत नाही. चंद्रपुरात महापौर पदाची निवडणूक लढवणार चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, चंद्रपूरमध्ये काहीही होऊ शकते. भाजप महापौर पदाची निवडणूक लढवणार आहे. आमची महायुती झाली किंवा कोणी बाहेरुन पाठिंबा दिला किंवा वेगळे चित्र निर्माण झाले तर त्याचा निर्णय मुनगंटीवार, जोरगेवार हे ठरवतील त्यांच्याकडे तिथली जबाबदारी देण्यात आली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर