ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

खरातला एसआयटीचा दणका:2 गुन्ह्यांत तब्बल 1200 पानी दोषारोपपत्र दाखल, सायबर सेलने 13 हजारांहून अधिक आक्षेपार्ह लिंक्स केल्या डिलीट

4 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


भोंदू अशोक खरातविरोधात तपासाला गती देत एसआयटीने लैंगिक अत्याचाराच्या दोन गुन्ह्यांमध्ये न्यायालयात तब्बल 1200 पानी दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणातील पीडितांची बदनामी रोखण्यासाठी सायबर पोलिसांच्या मदतीने आक्षेपार्ह व्हिडिओच्या तब्बल 13,175 लिंक्स आणि हे व्हिडिओ वारंवार पोस्ट करणारी 451 खाती कायमस्वरूपी डिलीट केली आहेत. पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या आदेशानुसार, 20 मार्चपासून खरातविरोधातील गुन्ह्यांचा तपास एसआयटीकडे सोपवला आहे. 24 सदस्यांच्या या विशेष तपास पथकामध्ये 2 पोलीस उपअधीक्षक आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. नाशिक, अहिल्यानगर जिल्ह्यांत मिळून एकूण 17 गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी एसआयटी एकूण 11 गुन्ह्यांचा तपास करत आहे. महिलांवरील अत्याचाराचे 8 आणि फसवणुकीच्या एका गुन्ह्याचा तपास एसआयटीकड आहे. खरातने स्वतःला वाचवण्यासाठी साक्षीदारांवर खोटा खंडणीचा गुन्हा आणि फिर्यादीवर दबाव टाकून आणखी 1 गुन्हा दाखल केला होता; या 2 गुन्ह्यांचा तपासही एसआयटीकडे आहे. अधिक पुरावे मिळताच पुरवणी आरोपपत्र दाखल करू नवीन कायद्यातील तरतुदीनुसार महिलांशी संबंधित गुन्ह्यांत गुन्हा दाखल झाल्यापासून 60 दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल करणे आवश्यक असते. 17 मार्चला दाखल पहिल्या गुन्ह्यासह आतापर्यंत 2 प्रकरणांत नाशिक न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. या प्रकरणाचा तपास थांबलेला नाही; अधिक पुरावे हाती लागताच न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल केले जाईल. – तेजस्विनी सातपुते, एसआयटीच्या प्रमुख सायबर सेलने केली धडक कारवाई

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर