ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

विधान परिषदेच्या 17 जागांचा बिगुल:ठाणे ते नागपूरपर्यंत रंगणार मोठा राजकीय रणसंग्राम; निवडणुकीत कोणाची बाजी?

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी हालचाल सुरू झाली असून, विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणुकीचा मार्ग मोकळा होत असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या अडीच वर्षांपासून रिक्त असलेल्या या जागा भरण्यासाठी प्रक्रिया गतीमान झाली आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता परिषद निवडणुकीसाठी आवश्यक असलेली प्रक्रिया सुरू झाली आहे. 17 मतदारसंघांतील निवडणुकीचा अहवाल लवकरच केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवला जाणार आहे. जरी राज्यातील 20 जिल्हा परिषदांच्या निवडणुका अद्याप बाकी असल्या तरी परिषद निवडणुकीत त्याचा अडथळा येणार नसल्याचे सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच निवडणुकीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. या निवडणुका राज्यातील अनेक महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये होणार आहेत. त्यामध्ये सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा-गोंदिया, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, अमरावती, धाराशिव-लातूर-बीड, परभणी-हिंगोली, छत्रपती संभाजीनगर-जालना आणि नागपूर या मतदारसंघांचा समावेश आहे. या सर्व ठिकाणी स्थानिक पातळीवर राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असल्याने निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे. विधानसभेतील सध्याचे संख्याबळ पाहता महायुतीची स्थिती मजबूत असल्याचे दिसते. भाजपकडे 131, शिवसेना (शिंदे गट) 57 आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) 40 आमदार असून, इतर सहयोगी पक्षांसह महायुतीचे एकूण संख्याबळ 234 वर पोहोचते. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस 16, राष्ट्रवादी (शरद पवार गट) 10 आणि शिवसेना (ठाकरे गट) 20 असे मिळून 49 आमदार आहेत. इतर पक्ष आणि अपक्ष मिळून एकूण 286 आमदारांचे सभागृह आहे. शेवटच्या क्षणी समीकरणे बदलण्याचीही शक्यता विधान परिषद निवडणुकीत एका उमेदवाराला विजयी होण्यासाठी 28 मतांचा कोटा आवश्यक असतो. या गणितानुसार महायुतीचे किमान 8 उमेदवार सहज निवडून येऊ शकतात, असे स्पष्ट होत आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीला केवळ एक जागा निश्चित मिळू शकते, तर दुसऱ्या जागेसाठी त्यांना अतिरिक्त 10 मतांची गरज भासणार आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत ही मते मिळवणे कठीण मानले जात आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत महायुतीची बाजू वरचढ राहण्याची शक्यता व्यक्त होत असली, तरी राजकीय घडामोडींमुळे शेवटच्या क्षणी समीकरणे बदलण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर