ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

अरे बेट्यांनो इतक्या लवकर मी काय जात नसतो तुम्हाला सोडून:अजित पवारांचा AI व्हिडिओ व्हायरल; महाराष्ट्र थांबू नये, काम सुरूच ठेवा

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


अरे बेट्यांनो इतक्या लवकर मी काय जात नसतो तुम्हाला सोडून. इतक्या लवकर मी तुम्हाला सोडून जाईन, यावर माझाच विश्वास बसत नाही, अशा शब्दांत अजितदादा पवार यांचा AI व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ सध्या चर्चेत आला असून ते पाहून साऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आले. या एआय व्हिडीओमध्ये अजित पवार यांच्या आवाजाची, देहबोलीची आणि शैलीची हुबेहूब नक्कल करण्यात आली आहे. जनतेशी संवाद साधत असल्याचा भास निर्माण करणाऱ्या या व्हिडीओमध्ये ‘दादा’ आपल्या कार्यकर्त्यांना आणि महाराष्ट्रातील जनतेला भावनिक संदेश देताना दिसत आहेत. व्हिडिओत नेमके काय म्हटलंय? “अरे बेट्यांनो, इतक्या लवकर मी तुम्हाला सोडून जातो, हे मला स्वतःवरही विश्वास बसत नाही. बी अजित पवार म्हणतात मला, पण नियतीचा खेळ बघा — आज माझा प्रवास इथंच थांबतोय. राजकारण आपल्या जागी आहे, पण काम महत्त्वाचं आहे. लोकांनी मला ‘कामाचा माणूस’ म्हटलं, आणि तीच माझ्या आयुष्यातली खरी कमाई आहे. शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यासाठीच धावत होतो आज निरोप घेताना मन खूप जड आहे. पण समाधान आहे की शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमच्यासाठीच धावत होतो. मी तुम्हाला शब्द दिला होता की जोपर्यंत हातपाय चालतात, तोपर्यंत तुमचं भलं करण्यासाठी झटत राहीन. नियती बघा, आज माझ्या हक्काच्या बारामतीच्या मातीत तुमच्या सेवेत येत असताना माझे हातपाय कायमचे थांबले. तरीही मला अभिमान आहे की मी रिकाम्या हातानं नाही, तर तुमच्या कामाची फाईल छातीशी धरून या जगाचा निरोप घेतोय. तुमच्या हक्कासाठी ‘दादा’ म्हणून उभा राहिलो माझ्या डोळ्यासमोर शेवटच्या क्षणी फक्त तुमचाच चेहरा आहे. हो, माझा स्वभाव थोडा रोखठोक होता; कधी ओरडलो असेन, कुणाचं मन दुखावलं असेल. पण त्या रागामागे फक्त एकच उद्देश होता — माझ्या सामान्य माणसाचं काम होणं. सत्तेसाठी नाही, तुमच्या हक्कासाठी मी नेहमीच ‘दादा’ म्हणून उभा राहिलो. महाराष्ट्र थांबू नये आता मी निरोप घेतोय, पण महाराष्ट्र थांबू नये. माझी जबाबदारी आता मी तुमच्यावर सोपवतोय. राजकारण करा, पण विकासाची गती थांबू देऊ नका. जाता जाता माझ्या शैलीत डोळे पुसून सांगतो, आता रडू नका; उभे राहा आणि कामाला लागा. माझा महाराष्ट्र अजून खूप पुढे जाईल. तुमचाच कामाचा माणूस, अजितदादा पवार!

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर