ब्रेकिंग न्यूज
⚡ मारेगावच्या विद्यार्थी चळवळीला नवे नेतृत्व! आनंद काकडे NSUIच्या तालुकाध्यक्षपदी ✦ ⚡ Tiger Shroff : धडाधड ७ गोळ्या झाडूनही सेफ…टार्गेटवर असूनही टायगर श्रॉफचा जीव कसा वाचला! समोर आली शॉकिंग म… ✦ ⚡ डेटिंग ॲपवर ओळख, आधी संबंध ठेवले, मग महिलेनं केलं भयंकर कांड , छत्रपती संभाजीनगरमधील खळबळजनक घटना ✦ ⚡ IND vs ZIM : 54 बॉलमध्ये नुसती मॅच जिंकली नाही तर केला रेकॉर्ड, स्मृतीच्या कॅप्टन्सीत पहिलाच मालिका विजय ✦ ⚡ मारेगावात युवा व्यापारी दुर्गोत्सव मंडळातर्फे भव्य महाप्रसादाचे आयोजन! ✦ ⚡ ‘आता पुढचा नंबर तुझा’, प्रदीप पूर्णेकरांनंतर कुटुंबातील तरुणीला जीवे मारण्याची धमकी ✦ ⚡ मध्यरात्रीची वेळ, अनोळखी स्पर्श पाहून शेतकऱ्याची पत्नी ओरडतच उठली, त्यानं तोंडात बोळा कोंबला अन्…, सोलापू… ✦ ⚡ News 18 Marathi Headlines | 17 OCT | 9 AM | Abhijit Dipke | Fadnavis | Sanap | Maharashtra Politics ✦ ⚡ पतीसोबत भांडण, पत्नीनं फेसबुकवर ज्योतिषी शोधला, 9 महिन्यांनी कळालं कांड, नवी मुंबईत शॉकिंग प्रकार ✦ ⚡ खवय्यांच्या ताटातून इंद्रायणी भात गायब होणार? मावळचा शेतकरी संकटात, तांदूळ महागण्याची शक्यता
SP News Maregaon

तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांसाठी मारेगावात रणशिंग!

348 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

पंचशील विद्यालयात सहविचार सभा; सर्व शारीरिक शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग

सुरेश पाचभाई | मारेगाव

मारेगाव : तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाला आता वेग आला असून, विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्याला योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी मारेगाव तालुका सज्ज होत आहे. स्पर्धांच्या नियोजनाला अंतिम दिशा देण्यासाठी पंचशील विद्यालय, नवरगाव येथे गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ रोजी महत्त्वपूर्ण सहविचार सभा उत्साहात पार पडली. तालुक्यातील शारीरिक शिक्षकांनी सभेला उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्याची भूमिका स्पष्ट केली.

सभेच्या अध्यक्षस्थानी पंचशील विद्यालयाचे मुख्याध्यापक ए. डी. चव्हाण सर होते. विद्यार्थ्यांमध्ये खेळाविषयी जागृती निर्माण करण्याची गरज अधोरेखित करत त्यांनी शारीरिक शिक्षकांना मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे म्हणून तालुका क्रीडा संयोजक बी. एस. काकडे सर उपस्थित होते. यावेळी मुख्याध्यापक महाडुळे सर, ताजने सर आणि ठाकरे सर यांचीही प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनंजय ठेपाले सर यांनी केले.

नियोजनापासून वयोगटांपर्यंत सविस्तर मार्गदर्शन
तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन, स्पर्धा घेण्याची पद्धत तसेच विविध वयोगटांबाबत बी. एस. काकडे सर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. स्पर्धा शिस्तबद्ध, पारदर्शक आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी उपस्थित शारीरिक शिक्षकांनी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. स्पर्धांच्या यशस्वी आयोजनासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाहीही यावेळी देण्यात आली.

शारीरिक शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग
सहविचार सभेस सतीश गौरकर सर, मेश्राम सर, लांडगे सर, देवाळकर सर, हिलगे सर, कुडमेथे सर आणि काळे सर यांनी विशेष सहकार्य केले. त्यांच्या सहभागामुळे आगामी क्रीडा स्पर्धांच्या नियोजनाला अधिक बळ मिळाले.

मारेगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्याला व्यासपीठ मिळवून देण्याच्या दृष्टीने या सभेला महत्त्व प्राप्त झाले आहे. स्पर्धांचे नियोजन आता अंतिम टप्प्यात येत असून, आगामी काळात तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांचा उत्साह आणि क्रीडा कौशल्य पाहायला मिळणार आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर