ब्रेकिंग न्यूज
Navi Mumbai Crime School | धक्कादायक! स्कूल बसमध्ये चिमुरडीसोबत गैरकृत्य | News18 Marathi Navi Mumbai: “ड्रायव्हर काकांनी त्रास दिला…” पोट दुखू लागल्यावर ३ वर्षाच्या चिमुकलीने आजीला काय सांगितलं,… तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांसाठी मारेगावात रणशिंग! Kolhapur: घरात कुणी नव्हतं, चुलत दिरानं एकटीला गाठलं अन्…, भयंकर कृत्यानं कोल्हापूर हादरलं! बांगलादेशच्या क्रिकेटरने इतिहास घडवला, ट्रिपल सेंच्युरी ठोकली… पण 400 रनचा चान्स स्वत:च सोडला! 2 लाख खर्च केला अन् पांढऱ्या सोन्याची झाली माती, बीडच्या शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी VIDEO पिंपरी-चिंचवडकर पाणी जपून वापरा, ऐन पावसाळ्यात पुरवठा बंद राहणार, कधी आणि कुठं? सविस्तर Pakistan Cricket : 24 तासात पाकिस्तान क्रिकेटमध्ये उलथापालथ! 7 खेळाडूंची हकालपट्टी केल्यानंतर सिलेक्टरचा रा… पावसाने वाढवली चिंता, फुलोऱ्यातच सोयाबीनची फुलगळ आणि पानगळ, शेतकऱ्याचा खर्चही निघणं अवघड पुजेला अजून सामान लागेल, नवऱ्याला घराबाहेर पाठवलं, भोंदूबाबाचा विवाहितेवर अत्याचार, चंद्रपूर हादरलं
SP News Maregaon

Navi Mumbai: “ड्रायव्हर काकांनी त्रास दिला…” पोट दुखू लागल्यावर ३ वर्षाच्या चिमुकलीने आजीला काय सांगितलं,…

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


नवी मुंबई : नवी मुंबईतील कामोठे परिसरात एक अत्यंत संतापजनक आणि चीड आणणारी घटना समोर आली आहे. शाळेच्या खाजगी बस चालकाने अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर बसमध्येच लैंगिक अत्याचार केल्याची मन सुन्न करणारी घटना घडली आहे. स्कूल बसमधील सगळ्या विद्यार्थ्यांना सोडल्यानंतर ही पीडित चिमुकली शेवटी एकटीच उरली होती. नेमका याचाच गैरफायदा घेत नराधम चालकाने तिच्यावर अत्याचार केला असल्याची माहिती समोर आली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी ३० वर्षीय चालकाला अटक केली असून पनवेल न्यायालयाने त्याला शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
अशी समोर आली घटना
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित चिमुकली दररोज इतर मुलांसोबत या खाजगी स्कूल बसने शाळेत ये-जा करत असे. बुधवारी दुपारी १२.३० च्या सुमारास आरोपी चालकाने केजी आणि प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना नेहमीप्रमाणे घरी सोडण्यास सुरुवात केली. त्यानंतर एक-एक करून सर्व मुले आपापल्या ठिकाणी उतरली. शेवटी ही तीन वर्षांची मुलगी एकटीच बसमध्ये राहिली. त्यावेळी आरोपी बस चालकाने संधी साधत तिच्यावर अत्याचार केला.
पोटात दुखू लागलं अन् आजीनं…
मुलगी घरी पोहोचल्यानंतर तिने पोटात तीव्र दुखत असल्याची तक्रार केली. त्यानंतर तिने आपल्या आजीला "बसच्या ड्रायव्हर काकांनी त्रास दिला," असे सांगितले. चिमुकलीच्या या सांगण्यावरून कुटुंबीयांनी तात्काळ शाळा प्रशासनाकडे जाब विचारला आणि पोलिसांत तक्रार दाखल केली. त्याच दरम्यान मुलीच्या वैद्यकीय तपासणीत तिच्यावर अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. या घटनेने सगळेच हादरून गेले आहेत.
आरोपीविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल…
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) मधील १२ वर्षांखालील बालकावरील बलात्काराशी संबंधित कठोर कलमे आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी आरोपीला पनवेल न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी शाळा प्रशासनातील कर्मचाऱ्यांचेही जबाब नोंदवले जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर