ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

मारेगाव तालुक्यातील शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी जनजागृती व्याख्यान.

95 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगाव येथील नगरपंचायतच्या प्रांगणात.

सुप्रसिद्ध व्याख्याते तथा प्रखर विचारवंत सोपानदादा कनेरकर करणार उदबोधन.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध व्याख्याते, लाखो युवकांचे प्रेरणास्थान , प्रखर विचारवंत, आपल्या प्रबोधनातून जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रावर प्रकाश टाकणारे कीर्तनकार, प्रवचनकार, व्याख्याते ह. भ. प. सोपानदादा कनेरकर यांचे मारेगाव येथे शेतकरी आत्महत्या थांबवण्याच्या उद्देशाने व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

मारेगाव येथील नगरपंचायतच्या प्रांगणावर दि.15 सप्टेंबरला सायंकाळी 7 वाजता या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन क्रांती युवा संघटना, जनहित कल्याण संघटना आणि मारेगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.देशात मोठया प्रमाणावर शेतकरी आत्महत्या होत आहेत.

या नेहमीच्या होणाऱ्या आत्महत्यासाठी यवतमाळ जिल्हा कुप्रसिद्ध आहे. त्यातच मागील काही महिन्यांपासून जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यात आठवड्यातून दोन ते तीन अशा आत्महत्या होत आहेत. शासन स्तरावरून या आत्महत्या थांबाव्या म्हणून कुठलीही ठोस पावले उचलली जात नाही.

यासाठी तालुक्यामध्ये सामाजिक उपक्रम राबवून आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या क्रांती युवा संघटना, जनहित कल्याण संघटना आणि मारेगाव तालुका पत्रकार संघाने पहल करीत यासाठी पुढाकार घेत आत्महत्या करू नये यासाठी प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सोपानदादा कनेरकर हे उच्च विद्या विभुषित आहे.

त्यांच्या महान कर्यामुळे त्यांना वेगवेगळे पुरस्कार सुद्धा मिळालेले आहे.तसेच मोटिवेशनल वक्ते म्हणूनही ते प्रसिद्ध आहे.संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांना आपल्या व्याख्यान आणि कीर्तनाने भुरळ घालणारे व्यक्तिमत्व, तसेच कमी वयापासून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक सलोखा जोपासत वयाच्या 9 व्या वर्षांपासून प्रबोधनास सुरुवात करणारे सोपानदादा कनेरकर यांच्या व्याख्याणाला ऐकण्यासाठी तालुक्यातील नागरिकांनी मोठया प्रमाणावर उपस्थित राहावे असे आवाहन जनहित कल्याण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर खुराणा तसेच तालुका पत्रकार संघाच्या वतीने करण्यात येत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर