ब्रेकिंग न्यूज
पिसगाव येथे मिस्त्री कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या Dhiraj Pardeshi Case Update | धीरज परदेशी प्रकरणी पोलिसांची कारवाई | Ahilyanagar Crime News पावसाळ्यात जनावराच्या तोंडाला अन् जिभेवर फोड, असू शकतो गंभीर आजराचा धोका, अशी घ्या काळजी वाह रे मित्र…! घरी आला, खाल्लं, पिलं अन् जाता जाता…, कोल्हापूर पोलिसांनी 24 तासांत उचललं महाआवास अभियानात प्रतीक्षा गाडगे यांची दमदार कामगिरी Shravan Astrology: श्रावणात ग्रह फिरले, कुणाला संधी तर कुणावर संकट. मेष ते मीन राशीवाले काय काळजी घ्याल? खर्च कमी अन् मिळेल भरघोस उत्पन्न, गट शेती ठरेल फायद्याची, कृषी तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला, Video Agniveer-Bharti-2026: भावांनो, लागा तयारीला…! कोल्हापुरात 14 सप्टेंबरपासून अग्निवीर भरती, कुणाला संधी? CRIME : रात्री बायकोसोबत ‘आखाड पार्टी’ केली अन् सकाळी शुद्धीत येताच डोक्यात कुकरचं झाकण घालून संपवलं! शिक्ष… Maratha OBC Reservation: मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटणार? जरांगेंच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी OBC सम…
SP News Maregaon

युवकाने काढली अल्पवयीन विद्यार्थिनीची छेड

1.9k Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगाव पोलिसांनी केले आरोपीस गजाआड

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव तालुक्यातील एका गावातील मुलगी नवरगाव येथे सामने पहावयास आलेली  मुलगी नळावर पाणी पिण्यास गेली असता एका युवकाने तिचा हात पकडून छेडखानी केली. सदर घटनेची मुलीने मारेगाव पोलीस स्टेशन येथे तक्रार करताच मारेगाव पोलिसांनी आरोपीच्या मुस्क्या आवळल्या.

तालुक्यातील नवरगाव (धरण)येथील पंचशील विद्यालय येथे क्रीडा सामने सुरू आहेत. त्या मुळे नवरगाव केंद्रातील अनेक शाळा तेथे सहभागी झालेल्या आहेत. हे सामने बघण्यासाठी सदर मुलगीही नवरगाव येथे गेलेली होती. तिथे सगणापुर येथील आशिष रमेश धानोरकर वय 19 हा सुद्धा गेलेला होता.

पीडित मुलगी सामने बघून पाणी पिण्यासाठी नळावर गेली असता आशिष रमेश धानोरकर हा सुद्धा नळावर गेला आणि तिचा हात पकडून तू माझ्याशी बोलत का नाहीस, तू माझ्याशी बोलली नाहीस तर मी तुझी इज्जत चारचौघात काढीन अशी धमकी दिली.यापूर्वी सुद्धा आरोपीने सदर मुलीची छेडखानी काढलेली होती.

घडलेला प्रकार पीडित मुलीने घरी जाऊन आपल्या भावास सांगितला.भावाने काल दि.19 डिसेंबर 2024 रोज गुरुवारला मारेगाव पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली.तक्रारीवरून मारेगाव पोलिसांनी आशिष धानोरकर विरुद्ध कलम 74, 75, 78,BNS सहकलम 8, 12,बा. लै.अ.प्र.सहकलम 3(1)W(i), कलम 3(1)(W) (ii)3(2)(va)अ. जा. ज. अ. प्र. का.नुसार गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

या घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामेश्वर वैजने पांढरकवडा यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय सोळंके करीत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर