ब्रेकिंग न्यूज
Dahihandi: दहीहंडीच्या जल्लोषात काळाचा घाला! २ गोविंदांचा दुर्दैवी मृत्यू, ३०० हून अधिक रुग्णालयात; पाहा कु… YouTube वर बघून घरफोडीचा प्लॅन, पाईपवरून घरात गेला पण…, सोलापुरात भयंकर घडलं, आरोपीला कर्नाटकात पकडलं! News 18 Marathi Headlines | 5 Sept | 9 AM | | Vishakha Raut | Dahi Handi 2026 | शेतकऱ्यांनो सरकारी चकरा कमी करा, ‘हे’ कार्ड आताच बनवून घ्या,कागदपत्र फिरवायची गरज भासणार नाही आजी नको म्हणत होती, पण त्यानं मुकबधिर मुलीला घरी नेलं, आधी भयंकर कृत्य, मग… शेवटी सोलापुरात ‘न्याय’ झाला Navi Mumbai Crime School | धक्कादायक! स्कूल बसमध्ये चिमुरडीसोबत गैरकृत्य | News18 Marathi Navi Mumbai: “ड्रायव्हर काकांनी त्रास दिला…” पोट दुखू लागल्यावर ३ वर्षाच्या चिमुकलीने आजीला काय सांगितलं,… तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांसाठी मारेगावात रणशिंग! Kolhapur: घरात कुणी नव्हतं, चुलत दिरानं एकटीला गाठलं अन्…, भयंकर कृत्यानं कोल्हापूर हादरलं! बांगलादेशच्या क्रिकेटरने इतिहास घडवला, ट्रिपल सेंच्युरी ठोकली… पण 400 रनचा चान्स स्वत:च सोडला!
SP News Maregaon

शेतकऱ्यांनो सरकारी चकरा कमी करा, ‘हे’ कार्ड आताच बनवून घ्या,कागदपत्र फिरवायची गरज भासणार नाही

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


Farmer ID News : सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी किंवा बँकांकडून कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांना अनेकदा कागदाचा ढीग घेऊन सरकारी कार्यालयात चकरा माराव्या लागतात. कधी महसुल अधिकारी कागदपत्रे देण्यास टाळटाळ करतो,कधी बँक अपूऱ्या कागदपत्राचे कारण देत शेतकऱ्याला परत पाठवते. त्यामुळे शेतकऱ्याच्या प्रचंड चकरा होतात.आता जर शेतजमिनीचे क्षेत्रफळ,पेरलेली पिके आणि पशुधनाचा तपशील यांसारखी सर्व कागदपत्रे एकाच ठिकाणी एकत्रित केली गेली तर शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल. कारण त्यांना प्रत्येक ठिकाणी जाण्यासाठी कागदपत्रे बाळगावी लागणार नाही.त्यामुळे ही सगळी कागदपत्रे एकत्रित आणण्यासाठी शेतकऱ्यांना कोणते ओळखपत्र बनवावे लागेल? हे जाणून घेऊयात.

देशभरातील 11 कोटी शेतकऱ्यांसाठी शेतकरी ओळखपत्रे तयार केली जात आहेत. हे शेतकरी ओळखपत्र केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी डिजिटल कृषी अभियानाचा एक भाग म्हणून तयार केले जात आहे. हे केवळ एक सामान्य ओळखपत्र नाही, तर शेतकऱ्याच्या जमिनीची नोंदींशी थेट जोडलेला आणि आधारशी सलंग्न असलेला एक स्मार्ट डेटाबेस आहे. यामध्ये शेतकऱ्यांची जमीन, त्याने घेतलेली पिके आणि त्यांच्या मालकीच्या जनावरांची संख्या यासह सर्व माहिती नोंदवली जाते. या ओळखपत्राच्या आधारे एक शेतकरी नोंदणी तयार केली जाईल, ज्यामुळे कागदपत्रांच्या वारंवार प्रत्यक्ष पडताळणीची गरज भासणार नाही.

फार्मर आयडीचे फायदे काय?

फार्मर आयडीचा सर्वात मोठा फायदा हा आहे की,शेतकरी आणि सरकारी तिजोरी यांच्यातील सर्व मध्यस्थांना दूर करते आणि हे कार्ड जवळपास सर्व शेतकऱ्यांसाठी उपयु्क्त ठरते.

PM किसान सन्मान निधी : या कार्डमध्ये ई केवायसी आणि जमिनीची पडताळणी आधीच समाविष्ट असल्याने, PM किसान सन्मान निधीचा हप्ता अडकण्याची समस्या संपुष्ठात येते.

स्वस्त पीक कर्ज : बँका आता कागदपत्र पडताळणीच्या नावाखाली आठवडाभर फाईल्स रोखून ठेवणार नाहीत. कार्ड नंबर टाकल्यावर, बँकेला एका क्लिकमध्ये शेतकऱ्याच्या मालकीची जमीन आणि तिची स्थिती कळेल.

किमान आधारभूत किमतीवर थेट खरेदी: शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीवर आपली पिके विकताना टोकन आणि पडताळणीच्या त्रासातून दिलासा मिळेल.

पीक विमा आणि आपत्ती निवारण: दुष्काळ किंवा गारपिटीच्या बाबतीत, नुकसान भरपाईची रक्कम कोणत्याही कागदपत्रांशिवाय थेट खात्यात जमा केली जाईल, ज्यामुळे फसवणूक पूर्णपणे रोखली जाईल.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर