ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

वाणी किडीवर उपाययोजना करण्याचे कृषि विभागाचे आवाहन

512 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव: तालुक्यात काही ठिकाणी अल्प प्रमाणात कापूस व सोयाबीन पिकांवर वाणी किंवा पैसा किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.गडद तपकिरी ते काळसर रंगाची दोन ते पाच सेंटीमीटर लांबीची हळूहळू चालणारी व हात लावल्यास गुंडाळणारी वाणी किंवा पैसा ही कीड निशाचर आहे.

ती मुख्यत्वे सेंद्रिय पदार्थावर जगणारी कीड आहे परंतु काही वेळेस कपाशी व सोयाबीन ची कोवळी पाने व शेंडे खातांना आढळून येते.या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आढळून येत असल्यास शेतात गवताचे ढीग करून ठेवावे व सकाळी त्याखाली लपलेल्या अळ्या गोळा करून नष्ट कराव्या.

बिजप्रक्रिया केलेल्या शेतांमध्ये या किडीचा प्रादुर्भाव कमी दिसतो. वारंवार किडीचा प्रादुर्भाव होणाऱ्या शेतात फिप्रोनील, कार्बोसल्फान किंवा क्लोरोपायरिफोस यासारखी दाणेदार ही कीटकनाशके पेरणीआधी जमिनीत मिसळून दिल्यास चांगले परिणाम दिसून आले आहेत.

उगवणीनंतर मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव असल्यास क्लोरोपायरीफोस 20 टक्के प्रवाही 35 ते 38 मिली प्रति 15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. अश्याप्रकारे वाणी/ पैसा किडीचे व्यवस्थापन करण्याचे आवाहन तालुका कृषि अधिकारी मारेगाव सुरेश बुटले यांचेमार्फत करण्यात आले आहे.

याबत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबीर अंतर्गत  मार्डी येथे मंडळ कृषि अधिकारी किशोर डोंगरकार यांनी वाणी/ पैसा कीड व्यवस्थापन बाबत शेतकऱ्यांना संबोधित केले. तालुका कृषि अधिकारी कार्यालयातील सहायक कृषी अधिकारी गावोगावी भित्तीपत्रके लावून तसेच सभा घेऊन वाणी/पैसा कीड व्यवस्थापन बाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर