ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण संपन्न

486 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव: तालुक्यात राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान अंतर्गत एकूण सहा क्लस्टर निवडण्यात आलेले असून एकूण अठरा गावांमध्ये नैसर्गिक शेतीचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

यातील हिवरा मजरा या गावामध्ये राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान अंतर्गत सरपंच आरती विशाल गाडगे व पोलीस पाटील राजेंद्र गाडगे तसेच प्रगतिशील शेतकरी राकेश गाडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत खरीप पूर्व नियोजन सभा व शेतकरी प्रशिक्षण संपन्न झाले.

प्रसंगी तालुका कृषि अधिकारी मारेगाव कु. दिपाली खवले यांनी नैसर्गिक शेती संकल्पना, नैसर्गिक शेतीचे आरोग्य व पर्यावरणाच्या दृष्टीने महत्व व विविध नैसर्गिक संसाधनांचा शेतीत वापर याविषयी शेतकऱ्यांना संबोधित केले.

तसेच मंडळ कृषि अधिकारी किशोर डोंगरकार यांनी खरीप पिक नियोजन, बिजप्रक्रिया, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन इ. विषयांवर शेतकऱ्यांशी संवाद साधला. सोबतच कृषि सहायक नकुल थोरात यांनी सोयाबीन उगवणक्षमता तपासणी चे महत्व प्रात्यक्षिकासह शेतकऱ्यांना पटवून दिले.

तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक प्रसन्न पारस्कर यांनी राष्ट्रीय सेंद्रिय शेती अभियान अंमलबजावणी व सेंद्रिय निविष्ठा तयार करावयाचे तंत्रज्ञान याविषयी शेतकऱ्यांशी चर्चा केली. कार्यक्रमाकरिता परिसरातील भरपूर शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषि सहायक सनथ घोसळकर व आभार प्रदर्शन कृषी सेवक विकास झिने यांनी केले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर