ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

हिवरीत केशर आंबा लागवड उपक्रमाचा शुभारंभ

407 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

प्रगतशील शेतकरी रमेश पिदुरकर यांचा पुढाकार – मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण सोहळा

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव: तालुक्यातील हिवरी गावात प्रगतशील शेतीचा नवा अध्याय सुरू झाला आहे. गावातील प्रगतशील शेतकरी श्री. रमेश श्रीराम पिदुरकर यांच्या शेतात बुधवारी (दि. 20 ऑगस्ट 2025) दुपारी 3 वाजता केशर आंब्याची लागवड करून उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

या वृक्षारोपण सोहळ्याला तालुका कृषी अधिकारी दिपाली खवले, सहाय्यक कृषी अधिकारी श्री. सचिन आत्राम,  तसेच संबंधित  तलाठी श्री जीवन आत्राम हे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते आंब्याच्या रोपांना माती देऊन या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.

श्री. पिदुरकर यांच्या शेतातील या आंबा लागवड उपक्रमामुळे भविष्यात आंबा उत्पादनातून उत्पन्नवाढीसोबतच परिसरातील शेतकऱ्यांना प्रगतशील शेतीचे नवे मार्गदर्शन मिळणार आहे. केशर आंब्याचे उत्पादन हे केवळ बाजारपेठेतच नव्हे तर निर्यातीसाठीही फायदेशीर ठरणार असल्याचे कृषी तज्ज्ञांचे मत आहे.

गावातील शेतकरी वर्ग या उपक्रमामुळे प्रेरित होऊन आधुनिक शेतीकडे वळेल, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर