ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

सर्व शेतकरी बांधवांना बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा…!

191 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

जगाचा पोशिंदा शेतकरी त्याला साथ बैलाची दोघांच्या कष्टातून हिरवी पिके फुलती..!

विदर्भ एस पि न्युज नेटवर्क:- मारेगांव,

पोळा हा सण बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा ऐतिहासिक दिवस मानला जाणारा सण म्हणजे पोळा.महाराष्ट्रात पोळा हा सण.शेतकरी पारंपारिक पद्धतीने मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरा करतात.

भारतीय शेतकऱ्याला शेतीच्या कामात बैलांचा खूप उपयोग असुन बैल वर्षभर शेतात कष्ट करतो.त्यामुळे आपल्याला अन्न मिळते.बैल आपला पोशिंदा आहे. त्याचा मान राखण्यासाठी पोळा हा सण साजरा केला जातो.या सणाला ‘बैलपोळा’ असेही म्हणतात.

यावर्षी पोळा हा सण आज दिनांक 2 सप्टेंबर 2024 सोमवारला आहे. पोळा हा सण दर्श अमावस्या (श्रावण मासातील अमावस्या) साजरा केला जातो.या दिवशी बैलांच्या कष्टांना सुट्टी असते.त्यांना त्या दिवशी मनसोक्त चरण्यासाठी माळरानावर सोडले जाते.

त्यांची आंघोळ घालून शेतकरी आपल्या बैलांना विविध रंगाने व रंगीबेरंगी झुल घालून,कपाळावर सिंदूर लावून, फुलांच्या माळांनी सजवून झुली,बाशिंग,घुंगूरमाळा,वेसन मोरक्या,कासरे,घंटी सजावटीने त्यांना सजवले जाते व सणाची सुरुवात होते.त्याला ओवाळून त्याची पूजा केली जाते.त्याला वरणापुरणाचे जेवण जेवू घातले जाते.

नंतर त्याची गावातील मंदिरातून मिरवणूकही काढली जाते.हा सण म्हणजे बैलाचा सत्कारच असतो.शेतकरी हा सण मोठ्या कृतज्ञतेने व अत्यंत आनंदाने साजरा करतात.पोळ्याचा दुसरा दिवस म्हणजेच तान्हा पोळा व मारबतीचा दिवस होय.श्रावण महिन्याचा अखेरचा सण म्हणजे पोळा. यानंतर चाहुल लगते ती बाप्पच्या आगमनाची …. गणेशोत्सवाची.

“विदर्भ एस.पि.न्यूज नेटवर्क मारेगाव,वणी व झरी जामणीच्या सर्व टीम कडून सर्व शेतकरी बांधवांना बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा…!

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर