ब्रेकिंग न्यूज
⚡ शेताच्या बांधावरून थेट रुपेरी पडद्यावर! वेगावच्या अजय बदकी यांची ‘हुंकार’मधून दमदार एन्ट्री! ✦ ⚡ दुष्काळात बीडच्या शेतकऱ्यानं करून दाखवलं, 500 रुपयांच्या खर्चात मिळवलं तब्बल 32 क्विंटल सोयाबीनचे उत्पादन, … ✦ ⚡ लेकीच्या सुखासाठी कर्ज काढलं, पण जावई निघाला…, लग्नानंतर 4 महिन्यांत सगळं संपलं, संजनाचा आईला शेवटचा फोन … ✦ ⚡ Pawanraje Nimbalkar Murder Case : पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाला नवं वळण! पद्मसिंह पाटलांचा पाय खोलात? CB… ✦ ⚡ CRIME : फेसबूक LIVE सुरू असताना थरारक हत्याकांड! मेडिकल स्टोअरबाहेर पेटला वाद अन् ‘स्टिंग ऑपरेशन’ करताना झा… ✦ ⚡ Success Story : शेती करावी तर अशी, तीन पिकातून बीडच्या शेतकऱ्याचं पालटलं नशीब, वर्षाला 8 लाख कमाई, Video ✦ ⚡ IAS Tukaram Mundhe : MPSC चौकशी समितीवर नियुक्ती अन् FDA मधून बदलीची चर्चा; अखेर तुकाराम मुंढेंनी मौन सोडलं… ✦ ⚡ शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! कर्जमाफीच्या तिसऱ्या यादीत नाव असेल तर लगेच करा हे काम ✦ ⚡ Kolhapur Crime: एकत्रच जीव देणार होतो पण…, प्रियकराचा शॉकिंग खुलासा, कोल्हापूरला हादरवणाऱ्या प्रकरणात नेम… ✦ ⚡ Dhruv Rathee : मॅकेनिकल इंजीनियरिंग ते जर्मनीत उच्च शिक्षण! पाहा कसा आहे ध्रुव राठीचा शैक्षणिक प्रवास
SP News Maregaon

IAS Tukaram Mundhe : MPSC चौकशी समितीवर नियुक्ती अन् FDA मधून बदलीची चर्चा; अखेर तुकाराम मुंढेंनी मौन सोडलं…

5 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मुंबई: पुण्यात गेल्या १२ दिवसांपासून सुरू असलेले राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे तीव्र आंदोलन १२ ऑक्टोबर २०२६ च्या मध्यरात्री अखेर मागे घेण्यात आले. राज्य सरकारची मध्यस्थी आणि विद्यार्थ्यांच्या मुख्य मागण्यांवर सकारात्मक निर्णय झाल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. या घडामोडींनंतर MPSC चे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी चौकशी पूर्ण होईपर्यंत आपण रजेवर जात असल्याचे ट्विटद्वारे जाहीर केले. तर, दुसरीकडे पेपरफुटी प्रकरणाच्या चौकशीसाठी तुकाराम मुंढे यांची सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे तुकाराम मुंढे यांची एफडीएमधून बदली होणार का, याची चर्चा सुरू झाली आहे. त्यावर तुकाराम मुंढे यांनी भाष्य केले आहे.

पुण्यातील MPSC उमेदवारांच्या आंदोलनानंतर सरकारने चौकशीसह विविध मागण्यांबाबत निर्णय जाहीर केला. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. MPSC परीक्षांमधील कथित पेपरफुटी आणि भरती प्रक्रियेतील अनियमिततेची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय आयोग नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. माजी न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी आयोग स्थापन केला आहे.
बदलीच्या चर्चांवर तुकाराम मुंढे काय म्हणााले?
अन्न आणि औषध प्रशासन विभागाचा कार्यभार आयुक्त म्हणून हाती घेतल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी धडाकेबाज कारवाई सुरू केली. नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देत भेसळखोरांविरोधात मोहीम सुरू केली. स्वच्छता, दर्जेदार आणि नियमांनुसार खाद्यपदार्थ नागरिकांना मिळावे यासाठी एफडीएकडून कारवाई सुरू आहेत. अशातच आता तुकाराम मुंढे यांच्यावर एमपीएससीशी संबंधित जबाबदारी आल्याने त्यांच्या बदलीची चर्चा सुरू झाली. त्यावर तुकाराम मुंढे यांनी ट्विट करत या चर्चांवर भाष्य केले आहे.

तुकाराम मुंढे यांनी एफडीएतून बदली होणाऱ्या चर्चांवर उत्तर देताना आपली एफडीएमधून बदली झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे. आपल्याकडे असलेल्या पदावर कार्यरत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

No, I have not been transferred from FDA.
नाही, माझी FDA मधून बदली झालेली नाही.
I continue to serve as Commissioner, FDA Maharashtra. Our fight against unsafe, substandard, adulterated food and spurious, substandard drugs goes on.

मी अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र येथे आयुक्त म्हणून कार्यरत आहे. भेसळयुक्त अन्न आणि निकृष्ट औषधांविरुद्धची आमची लढाई सुरूच आहे.

#TukaramMundhe #Trust

— Tukaram Mundhe (@Tukaram_IndIAS) October 12, 2026

त्यांनी म्हटले की,  अयोग्य, निकृष्ट, भेसळयुक्त अन्न आणि बनावट तसेच निकृष्ट दर्जाच्या औषधांविरुद्धची आमची लढाई यापुढेही अशीच सुरूच राहील, असेही तुकाराम मुंढे यांनी म्हटले.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर