ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

दोन सरकारी नोकऱ्या त्यागून पूर्ण केले PSI होण्याचे स्वप्न:शिवणी रसुलापूरच्या अजिंक्य ढोकेची गावकऱ्यांनी काढली मिरवणूक‎

4 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


नांदगाव खंडेश्वर तालुक्याच्या शिवणी रसुलापूर येथील शेतकरी कुटुंबातील मुलगा अजिंक्य ढोके यांची मुंबई पोलिस उपनिरीक्षकपदी (पीएसआय) निवड झाली. ही निवड पूर्णत्वास जाण्यासाठी त्याने त्यापूर्वीच्या दोन सरकारी नोकऱ्यांचा त्याग केला. त्याचा तो त्याग आणि पीएसआयचे स्वप्न पूर्ण करण्यासाठीची जिद्द ही गावकऱ्यांसाठी कौतुकाची बाब ठरली आहे. त्यामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, गावकऱ्यांनी मिरवणूक काढून हा आनंदोत्सव साजरा केला. महाराष्ट्र पोलिस अकादमीत वर्षभराचे कठोर प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या ५८३ प्रशिक्षणार्थींमध्ये ४५ वी रँक प्राप्त करत अजिंक्य ढोके यांनी जिद्द, चिकाटी,परिश्रमांवर हे यश संपादन केले आहे. अजिंक्य ढोके यांनी प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद मराठी शाळा, शिवणी येथे पूर्ण केले. सामान्य आर्थिक परिस्थितीत वाढलेल्या अजिंक्य यांनी अडचणींवर मात करत शिक्षणासोबत स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू ठेवली. विशेष म्हणजे कोचिंग क्लासला न जाता कर्तव्यनिष्ठा, सातत्यपूर्ण अभ्यास आणि परिश्रमावर त्यांनी हे यश मिळवून कुटुंबासह गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. प्रशिक्षण पूर्ण करून गावात आगमन झाल्यानंतर गावकऱ्यांनी मिरवणूक काढून अजिंक्यचे उत्स्फूर्त स्वागत केले. गावातील विविध ठिकाणी त्यांचा, त्यांच्या आई-वडिलांचा शाल, पुष्पहार व सन्मानचिन्ह देऊन गौरवही केला.अजिंक्य यांच्या या उल्लेखनीय यशामुळे शिवणीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून, त्यांच्या पुढील शासकीय सेवेसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांच्या यशामुळे परिसरातील विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा मिळाली आहे. या दोन नोकऱ्यांचा त्याग प्रारंभी अजिंक्य यांची नांदगाव खंडेश्वर येथे आरोग्य सेवक म्हणून निवड झाली होती. त्यानंतर त्यांची नागपूर येथे तलाठी पदावरही निवड झाली. मात्र, पोलिस अधिकारी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगत त्यांनी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले आणि त्या दोन्ही नोकऱ्यांचा त्याग करुन अखेर मुंबई पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर