ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

पालिका निवडणुकीआधीच भाजपमधील अंतर्गत संघर्ष उघड:अवघ्या 24 तासांत निवडणूकप्रमुख बदलावरून यू-टर्न; राजकारण काय?

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये नेतृत्व आणि संघटनात्मक जबाबदाऱ्यांवरून सुरू असलेला गोंधळ आता उघडपणे समोर येऊ लागला आहे. शंभर प्लसचा नारा देत निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या भाजपने सुरुवातीला नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले यांच्याकडे निवडणूकप्रमुख पदाची जबाबदारी सोपवली होती. मात्र, अवघ्या काही दिवसांतच हा निर्णय बदलत नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदे यांची त्या पदावर नियुक्ती करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. विशेष म्हणजे, या नियुक्तीनंतर 24 तासांतच भाजपाने पुन्हा आपली भूमिका बदलत दोघांनाही निवडणूक व्यवस्थेची जबाबदारी दिल्याचे जाहीर केले. या अचानक घेतलेल्या यू-टर्न मुळे भाजपमध्ये सर्वकाही सुरळीत नसल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. नाशिक महापालिका निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून भाजपाने जोरदार तयारी सुरू केली होती. शहरातील 122 जागांसाठी 1,200 इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती चार दिवस चालवण्यात आल्या. या संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख करण्यासाठी आणि निवडणुकीचे नेतृत्व करण्यासाठी राहुल ढिकले यांची निवडणूकप्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली होती. पक्षाच्या या निर्णयामुळे ढिकले समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. मात्र, मुलाखतींचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर अचानक प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सहीचे नियुक्तिपत्र पाठवत देवयानी फरांदे यांना निवडणूकप्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली. या अनपेक्षित निर्णयामुळे ढिकले समर्थकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आणि सोशल मीडियावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राहुल ढिकले यांचे काही दिवसांपूर्वीचे एक वक्तव्य पुन्हा चर्चेत आले. एका जाहीर कार्यक्रमात त्यांनी पक्षातीलच अंतर्गत विरोधकांवर निशाणा साधत, आजारी असतानाही माझ्या विरोधात काम करणाऱ्यांना धडा शिकवेन, असे स्पष्ट शब्दांत सांगितले होते. 122 जागांवर कोणाला उमेदवारी द्यायची हे ठरवण्याचा अधिकार माझा असल्याचे त्यांनी जाहीरपणे म्हटले होते. या वक्तव्याची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. या भाष्यामुळे ढिकले यांचा वाढता आत्मविश्वास आणि संभाव्य अहंकार पक्षातील काही गटांना खटकत असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यामुळेच त्यांच्या जागी देवयानी फरांदे यांची नियुक्ती करण्यात आल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. मात्र, देवयानी फरांदे यांची नियुक्ती जाहीर झाल्यानंतर केवळ 24 तासांतच भाजपने पुन्हा भूमिका बदलली. पक्षाच्या शहराध्यक्षांनी माध्यमांसमोर खुलासा करत, ही नियुक्ती बदल नसून संघटनात्मक व्यवस्थेचा भाग असल्याचे सांगितले. निवडणूक व्यवस्थेची जबाबदारी राहुल ढिकले आणि देवयानी फरांदे या दोघांनाही देण्यात आल्याचा दावा करण्यात आला. या खुलाशामुळे आणखीच प्रश्न निर्माण झाले. जर सुरुवातीपासूनच दोघांवर जबाबदारी होती, तर फरांदे यांच्या नियुक्तीपत्रात त्याचा उल्लेख का नव्हता? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. 24 तासांत घेतलेला हा ‘यू-टर्न’ भाजपातील अंतर्गत मतभेद झाकण्यासाठीच होता का, अशी चर्चा नाशिकच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे भाजपतील गटबाजी पुन्हा एकदा समोर आली आहे. राहुल ढिकले यांची अचानक झालेली बदली आणि त्यानंतरचा निर्णय बदल हा एका गटाच्या नाराजीमुळे झाल्याचे बोलले जात आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण होऊ नये, ढिकले समर्थक दूर जाऊ नयेत आणि पक्षातील फूट उघडपणे समोर येऊ नये, यासाठी भाजपाने तातडीचा तोडगा काढल्याची चर्चा आहे. मात्र, या साऱ्या घडामोडींमुळे भाजपाचे अंतर्गत नेतृत्व व्यवस्थापन आणि निर्णयप्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अंतर्गत मतभेद पूर्णपणे मिटले आहेत का? आगामी नाशिक महापालिका निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे. ‘शंभर प्लस’चा नारा देत पक्ष मैदानात उतरला असताना, नेतृत्वाच्या मुद्द्यावरून निर्माण झालेला गोंधळ विरोधकांना आयतेच कोलित देणारा ठरू शकतो. ढिकले आणि फरांदे या दोघांनाही एकत्र जबाबदारी देऊन भाजपने सध्या तरी परिस्थिती सावरल्याचे चित्र दिसत असले, तरी अंतर्गत मतभेद पूर्णपणे मिटले आहेत का? हा प्रश्न कायम आहे. पुढील काही दिवसांत भाजपची संघटनात्मक रणनीती आणि नेतृत्वाची भूमिका कशी ठरते, याकडे नाशिकसह राज्यातील राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर