ब्रेकिंग न्यूज
श्रावणात श्री क्षेत्र पांडवदेवीत भक्तांची अलोट गर्दी भाजपा मारेगाव शहर सरचिटणीसपदी रविंद्र टोंगे पैशांचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी पूजा; 15 वर्षीय मुलीसोबत घडणार होतं नको तेच, 15 जणांविरुद्ध गुन्हा पहाटे घराबाहेर पडताच तो मागे लागला; कॉलेजच्या वाटेत अडवलं अन् मुंबईत घडला भयंकर प्रकार IND vs SL Test : बॉलिंगने आग ओकणाऱ्या DSP सिराजचा बॅटिंगमध्ये जलवा; गगनचुंबी सिक्स पाहून श्रीलंका आवाक्, पा… पिसगाव येथे मिस्त्री कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या Dhiraj Pardeshi Case Update | धीरज परदेशी प्रकरणी पोलिसांची कारवाई | Ahilyanagar Crime News पावसाळ्यात जनावराच्या तोंडाला अन् जिभेवर फोड, असू शकतो गंभीर आजराचा धोका, अशी घ्या काळजी वाह रे मित्र…! घरी आला, खाल्लं, पिलं अन् जाता जाता…, कोल्हापूर पोलिसांनी 24 तासांत उचललं महाआवास अभियानात प्रतीक्षा गाडगे यांची दमदार कामगिरी
SP News Maregaon

हिंगोलीत जागा शासनाची आणि नागरिकांची पक्की घरे:125 जणांना जमीन मिळाली कशी? याबाबत कागदपत्रे सादर करण्याचे आदेश

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


हिंगोली शहरातील उच्चभ्रू वसाहती भागात जमिनीचे पीआर कार्ड शासनाच्या नावाचे असताना त्यावर नागरिकांनी घरे उभे केल्याची चित्र आहे यावरून उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांनी 125 जणांना नोटीस बजावले आहेत. या प्रकरणात कागदपत्रे सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत हिंगोली शहरात महसूल विभागाच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम जोरात सुरू केले जाणार आहे त्यानुसार जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी काही दिवसापूर्वी शहरातील काही अतिक्रमण भागाची पाहणी केली त्यानंतर उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांच्या पथकाने पाहणी देखील केली होती. त्यानंतर उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांनी 125 जणांना नोटीसा बजावले आहेत. सदरील जागा शासनाच्या मालकीची असताना ही जागा आपणास कशी मिळाली या जागेची कागदपत्रे सादर करावी अशा स्पष्ट सूचना या नोटीसद्वारे देण्यात आले आहेत. त्यानंतर आता या नागरिकांनी जागा मिळाल्याबाबतच्या कागदपत्रांचा शोध सुरू केला आहे सदरील कागदपत्रे सादर केल्यानंतर त्यावर उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांच्या उपस्थितीत सुनावणी होणार आहे. त्या सुनावणी नंतरच पुढील कारवाई केली जाणार असल्याचे महसूल विभागाच्या सूत्रांनी सांगितले. दरम्यान यानंतर आता रिसाला बाजार व फलटण भागात नागरिकांना नोटीस बजावले जाणार आहेत ज्या नागरिकांकडे त्यांना मिळालेली जागा कुठल्या पद्धतीने मिळाली याबाबतचा पुरावा नसेल त्यांच्यावर नियमानुसार कारवाई केली जाणार असल्याची सूत्रांनी सांगितले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर