ब्रेकिंग न्यूज
⚡ मारेगावात युवा व्यापारी दुर्गोत्सव मंडळातर्फे भव्य महाप्रसादाचे आयोजन! ✦ ⚡ ‘आता पुढचा नंबर तुझा’, प्रदीप पूर्णेकरांनंतर कुटुंबातील तरुणीला जीवे मारण्याची धमकी ✦ ⚡ मध्यरात्रीची वेळ, अनोळखी स्पर्श पाहून शेतकऱ्याची पत्नी ओरडतच उठली, त्यानं तोंडात बोळा कोंबला अन्…, सोलापू… ✦ ⚡ News 18 Marathi Headlines | 17 OCT | 9 AM | Abhijit Dipke | Fadnavis | Sanap | Maharashtra Politics ✦ ⚡ पतीसोबत भांडण, पत्नीनं फेसबुकवर ज्योतिषी शोधला, 9 महिन्यांनी कळालं कांड, नवी मुंबईत शॉकिंग प्रकार ✦ ⚡ खवय्यांच्या ताटातून इंद्रायणी भात गायब होणार? मावळचा शेतकरी संकटात, तांदूळ महागण्याची शक्यता ✦ ⚡ शाळा सुटल्यावर चौथीच्या मुलींना थांबवायचा, कपडे काढून डान्स करायचा अन्…, बीडमध्ये शिक्षकाचं भयंकर कृत्य, … ✦ ⚡ शाळा सुटल्यावर चौथीच्या मुलींना थांबवायचा, कपडे काढून डान्स करायचा अन्…, बीडमध्ये शिक्षकाचं भयंकर कृत्य, … ✦ ⚡ शिवाजी पार्कची दोस्ती, ‘नटसम्राट’ पाहून ढसाढसा रडला होता 1983 च्या वर्ल्ड कपचा हिरो! नाना पाटेकरांच्या क्रि… ✦ ⚡ शेताच्या बांधावरून थेट रुपेरी पडद्यावर! वेगावच्या अजय बदकी यांची ‘हुंकार’मधून दमदार एन्ट्री!
SP News Maregaon

खवय्यांच्या ताटातून इंद्रायणी भात गायब होणार? मावळचा शेतकरी संकटात, तांदूळ महागण्याची शक्यता

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पुणे :  खवय्यांच्या ताटात सुगंधाची दरवळ निर्माण करणारा इंद्रायणी तांदूळ यंदा ताटातून गायब होणार का, असा प्रश्न निर्माण झाला. सुगंध आणि चवीसाठी प्रसिद्ध असलेल्या मावळच्या इंद्रायणी भातशेतीवर पावसाच्या लहरीपणामुळे मोठं संकट ओढवलंय. जमिनीला पडलेल्या भेगा आणि करपलेलं पीक पाहून शेतकरी हवालदिल झालेत. तालुक्यातील सुमारे साडेबारा हजार हेक्टरवरील भातशेती संकटात सापडल्याने उत्पादन घटण्याची भीती व्यक्त होत आहे.

जमिनीला पडलेल्या या भेगा शेतकऱ्यांचं काळीज चिरत आहेत. ज्या शेतात पिकं डौलायची तिथे आता पाऊस नसल्यानं पिकांचा वाळून पेंडा झाला आहे. ज्या पिकातून भात पिकणार होता, ते पार सुकून गेलं-वाळून गेलं जणू काही त्याचं गवत झालं. परिणामी पावसाळ्यात बोंब ठोकण्याची आणि होळी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. मावळमध्ये आता शेतात होळी करावी लागतेय, मात्र मावळची ही ओळख नव्हती.
साडेबारा हजार हेक्टर क्षेत्रावर भातशेती
मावळ म्हटलं की डोळ्यांसमोर येते हिरवीगार भातशेती आणि या भातशेतीतून तयार होणारा सुगंधी इंद्रायणी तांदूळ… वैशिष्ट्यपूर्ण चव आणि सुगंधामुळे इंद्रायणीनं राज्यासह परदेशातील खवय्यांच्या ताटातही खास स्थान निर्माण केलं. जेवण शाकाहारी असो की मांसाहारी, खवय्यांना त्यात भात इंद्रायणीचाच हवा असतो. मात्र, यंदा याच इंद्रायणीच्या अस्तित्वावर संकट घोंगावतंय. तालुक्यात सुमारे साडेबारा हजार हेक्टर क्षेत्रावर भातशेती केली जाते.
60 ते 70 टक्के भातपिकाला फटका बसण्याची भीती
मात्र, गेल्या दीड महिन्यापासून पावसाने ओढ दिल्याने भातपिकाला पाण्याची कमतरता भासू लागली. परिणामी 60 ते 70 टक्के भातपिकाला फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बियाणं, खते, औषधं आणि मशागतीसाठी केलेला खर्च वाया जाणार आहे. परिणामी कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर निर्माण झालाय. मावळ तालुका दुष्काळग्रस्त घोषित करून नुकसान भरपाई देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
मावळच्या शेतात इंद्रायणीचं उत्पादन घटलं
संकटाची झळ फक्त शेताच्या बांधापुरती मर्यादित राहण्याची शक्यता नाही. कारण मावळच्या शेतात इंद्रायणीचं उत्पादन घटलं, तर बाजारातील तांदळाच्या उपलब्धतेवर आणि दरांवरही परिणाम होऊ शकतो. मागील वर्षी 65 ते 70 रुपये दराने मिळणाऱ्या इंद्रायणी तांदळासाठी यंदा सणासुदीच्या काळात 70 ते 90 रुपये मोजावे लागताहेत. उत्पादनात आणखी घट झाल्यास पुन्हा दरवाढीची शक्यता नाकारता येत नाही. एकंदरीतच एका बाजूला शेतकऱ्याच्या हातात उत्पन्न येण्याची आशा कमी होत आहे, तर दुसऱ्या बाजूला ग्राहकांच्या खिशावरचा भार वाढत आहे. त्यामुळे इंद्रायणीचा सुगंध जपणाऱ्या शेतकऱ्यांसह या तांदळाच्या चवीवर प्रेम करणाऱ्या खवय्यांचीही चिंता वाढली आहे.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर