ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

जैविक निविष्ठा उत्पादन केंद्राचे सिंधी येथे उदघाटन.

78 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

BCI कॉटन कनेक्ट विकासगंगा समजसेवी संस्था घाटंजी, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने जैविक निविष्ठा उत्पादन केंद्र महिला उद्योजक सौ. मनीषा बंडुजी कोसरे यांचे घरी जैविक निविष्ठा उत्पादन केंद्राचे उदघाटन सौ. प्रेमीला मोरेश्वर ढवस BCI महिला शेतकरी यांचे हस्ते करण्यात आले.

मारेगाव तालुक्यामध्ये कु. स्नेहल पिदूरकर [पी. यु. मॅनेजर यांच्या] मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणारा उत्तम कापूस प्रकल्प यात जैवविविधताचे संवर्धन करते. एकात्मिक कीड व्यवस्थापनाला चालना देणे, शेतकऱ्यांचा रासायनिक कीटकनाशकावर होणारा आर्थिक खर्च कमी करणे, यासाठी गावांमध्ये जैविक निविष्ठा उत्पादन केंद्राची स्थापना करण्यात आली.

हरिदास पवार, कृषिसाहाय्यक यांनी जैविक निविष्ठा उत्पादन केंद्र यांचे महत्व, निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, लमीत अर्क,जीवामृत, बिजामृत यांचे फायदे उपस्थित जनतेला पटवून दिले.मनोज भगत व कु. धनश्री थापडे क्षेत्रप्रवर्तक यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नितीन वाढई क्षेत्रप्रवर्तक यांनी तर आभारप्रदर्शन कु. पूजा ठेंगणे क्षेत्रप्रवर्तक यांनी मानले. या कार्यक्रमाला गावातील BCI पुरुष व महिला उपस्थित होत्या.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर