ब्रेकिंग न्यूज
⚡ मारेगावात युवा व्यापारी दुर्गोत्सव मंडळातर्फे भव्य महाप्रसादाचे आयोजन! ✦ ⚡ ‘आता पुढचा नंबर तुझा’, प्रदीप पूर्णेकरांनंतर कुटुंबातील तरुणीला जीवे मारण्याची धमकी ✦ ⚡ मध्यरात्रीची वेळ, अनोळखी स्पर्श पाहून शेतकऱ्याची पत्नी ओरडतच उठली, त्यानं तोंडात बोळा कोंबला अन्…, सोलापू… ✦ ⚡ News 18 Marathi Headlines | 17 OCT | 9 AM | Abhijit Dipke | Fadnavis | Sanap | Maharashtra Politics ✦ ⚡ पतीसोबत भांडण, पत्नीनं फेसबुकवर ज्योतिषी शोधला, 9 महिन्यांनी कळालं कांड, नवी मुंबईत शॉकिंग प्रकार ✦ ⚡ खवय्यांच्या ताटातून इंद्रायणी भात गायब होणार? मावळचा शेतकरी संकटात, तांदूळ महागण्याची शक्यता ✦ ⚡ शाळा सुटल्यावर चौथीच्या मुलींना थांबवायचा, कपडे काढून डान्स करायचा अन्…, बीडमध्ये शिक्षकाचं भयंकर कृत्य, … ✦ ⚡ शाळा सुटल्यावर चौथीच्या मुलींना थांबवायचा, कपडे काढून डान्स करायचा अन्…, बीडमध्ये शिक्षकाचं भयंकर कृत्य, … ✦ ⚡ शिवाजी पार्कची दोस्ती, ‘नटसम्राट’ पाहून ढसाढसा रडला होता 1983 च्या वर्ल्ड कपचा हिरो! नाना पाटेकरांच्या क्रि… ✦ ⚡ शेताच्या बांधावरून थेट रुपेरी पडद्यावर! वेगावच्या अजय बदकी यांची ‘हुंकार’मधून दमदार एन्ट्री!
SP News Maregaon

पतीसोबत भांडण, पत्नीनं फेसबुकवर ज्योतिषी शोधला, 9 महिन्यांनी कळालं कांड, नवी मुंबईत शॉकिंग प्रकार

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


नवी मुंबई: सध्याच्या काळात देखील जीवनातील छोट्या-मोठ्या बाबींसाठी ज्योतिष आणि राशीभविष्याच्या आहारी जाणारे अनेकजण आहेत. काहींना अशा प्रकारांची मोठी किंमत देखील चुकवावी लागते. असाच काहीसा प्रकार ऐरोलीतील एका महिलेसोबत घडला आहे. पती-पत्नीतील वाद मिटवण्यासाठी ती ऑनलाइन ज्योतिषाच्या आहारी गेली. यात तिला तब्बल 11 लाख 26 हजारांचा गंडा घालण्यात आला आहे.

पती-पत्नीतील वाद मिटवण्यासाठी विविध उपाय, मंत्र-तंत्राच्या नावाखाली महिलेकडून पैसे आणि सोन्याचे दागिने उकळण्यात आले. 9 महिन्यांपासून ही लूट सुरू होती. या प्रकरणात रबाळे पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दोन कथित भोंदू ज्योतिषांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू आहे.

Pune Crime: पुणे हादरलं! 3 अल्पवयीन मुलांनी तरुणाला गाठलं, सपासप वार करून जागीच संपवलं, धक्कादायक कारण समोर

नेमकं घडलं काय?

ऐरोलीत राहणाऱ्या महिलेचे पतीसोबत वारंवार खटके उडत होते. त्यावर तोडगा काढण्यासाठी तिने फेसबुकवरून ज्योतिषांची माहिती शोधली. तिथून मिळालेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून त्यांच्याकडे सल्ला मागितला. पती-पत्नीतील वाद कायमचा मिटवून देण्याचे आश्वासन संबंधित ज्योतिषांनी दिले. तसेच महिलेला काही उपाय करण्यास सांगितले.

9 महिन्यांत 11 लाखांची लूट

गेल्या 9 महिन्यांच्या काळात पती-पत्नीतील वाद मिटवण्याच्या नावाखाली ज्योतिषांनी मोठी लूट केली. रोख आणि ऑनलाइन माध्यमातून महिलेने 8 लाख 26 हजार रुपये ज्योतिषांना दिले. तर तीन लाख रुपयांचा सोन्याचा नेकलेस देखील दिला. मात्र, प्रश्न  सुटत नसल्याने आपली फसवणूक झाल्याची जाणीव महिलेला होता. त्यानंतर तिने पोलिसांकडे धाव घेतली.

दरम्यान, महिलेच्या तक्रारीनंतर रबाळे पोलिसांनी गुरुवारी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पैसे स्वीकारण्यासाठी वापरण्यात आलेली बँक खाती आणि मोबाइल क्रमांकाच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर