ब्रेकिंग न्यूज
⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल…
SP News Maregaon

राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान अंतर्गत दशपर्णी अर्क तयार : कृषि विभागाचा पुढाकार

365 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई मारेगाव,

मारेगाव : तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान अंतर्गत एकूण ६ क्लस्टरमध्ये नैसर्गिक पद्धतीने अन्नधान्य उत्पादन घेतले जात आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून हिवरा मजरा येथे दशपर्णी अर्क तयार करण्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक देत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमात उपस्थित राहून तालुका कृषि अधिकारी कु.दिपाली खवले यांनी नैसर्गिक शेतीचे महत्त्व, तिचे पर्यावरणपूरक फायदे तसेच नैसर्गिक निविष्ठा तयार करण्याच्या पद्धती याबाबत शेतकऱ्यांना माहिती दिली. “नैसर्गिक शेतीमुळे उत्पादन खर्चात बचत होते तसेच रासायनिक खते व कीटकनाशकांवरील अवलंबित्व कमी करता येते,” असेही त्यांनी सांगितले.

सहायक कृषि अधिकारी नकुल थोरात यांनी दशपर्णी अर्क तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया शेतकऱ्यांसमोर सविस्तर दाखवून स्पष्ट केली. या प्रात्यक्षिकासाठी लागणारे साहित्य गोळा करण्यासाठी कृषि सखी सुषमा ढेंगळे आणि अंजली गाडगे यांनी मोलाचे सहकार्य केले.
कार्यक्रमास गावातील प्रगतीशील शेतकरी विशाल गाडगे, विनोद ढेंगळे, पोलीस पाटील राजेंद्र गाडगे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

स्थानीय शेती सुधारणा पुढाकार
दिपाली खवले यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील शेतकरी नैसर्गिक शेती तंत्रे आत्मसात करत असून पर्यावरणपूरक व शाश्वत शेतीकडे एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले जात आहे. आगामी हंगामात या तंत्रांचा व्यापक प्रसार व्हावा यासाठी आणखी प्रत्यक्ष प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्याची योजना कृषि विभागाने आखली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर