ब्रेकिंग न्यूज
⚡ मारेगावच्या विद्यार्थी चळवळीला नवे नेतृत्व! आनंद काकडे NSUIच्या तालुकाध्यक्षपदी ✦ ⚡ Tiger Shroff : धडाधड ७ गोळ्या झाडूनही सेफ…टार्गेटवर असूनही टायगर श्रॉफचा जीव कसा वाचला! समोर आली शॉकिंग म… ✦ ⚡ डेटिंग ॲपवर ओळख, आधी संबंध ठेवले, मग महिलेनं केलं भयंकर कांड , छत्रपती संभाजीनगरमधील खळबळजनक घटना ✦ ⚡ IND vs ZIM : 54 बॉलमध्ये नुसती मॅच जिंकली नाही तर केला रेकॉर्ड, स्मृतीच्या कॅप्टन्सीत पहिलाच मालिका विजय ✦ ⚡ मारेगावात युवा व्यापारी दुर्गोत्सव मंडळातर्फे भव्य महाप्रसादाचे आयोजन! ✦ ⚡ ‘आता पुढचा नंबर तुझा’, प्रदीप पूर्णेकरांनंतर कुटुंबातील तरुणीला जीवे मारण्याची धमकी ✦ ⚡ मध्यरात्रीची वेळ, अनोळखी स्पर्श पाहून शेतकऱ्याची पत्नी ओरडतच उठली, त्यानं तोंडात बोळा कोंबला अन्…, सोलापू… ✦ ⚡ News 18 Marathi Headlines | 17 OCT | 9 AM | Abhijit Dipke | Fadnavis | Sanap | Maharashtra Politics ✦ ⚡ पतीसोबत भांडण, पत्नीनं फेसबुकवर ज्योतिषी शोधला, 9 महिन्यांनी कळालं कांड, नवी मुंबईत शॉकिंग प्रकार ✦ ⚡ खवय्यांच्या ताटातून इंद्रायणी भात गायब होणार? मावळचा शेतकरी संकटात, तांदूळ महागण्याची शक्यता
SP News Maregaon

Tiger Shroff : धडाधड ७ गोळ्या झाडूनही सेफ…टार्गेटवर असूनही टायगर श्रॉफचा जीव कसा वाचला! समोर आली शॉकिंग म…

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मुंबई: बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर रविवारी झालेल्या जीवघेण्या गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण मुंबईसह चित्रपटसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे. भररस्त्यात घडलेल्या या हल्ल्यामुळे चाहत्यांसह सामान्य नागरिकांच्या मनातही भीतीचे वातावरण पसरले आहे. या हल्ल्यात टायगर श्रॉफसह कार चालक आणि आणखी एक जण जखमी झाला असला, तरी सुदैवाने टायगर सुखरूप असून त्याला किरकोळ दुखापत झाली आहे. हल्लेखोरांनी त्याला संपवण्याच्या उद्देशानेच हा कट रचला होता, मात्र ‘काळ आला होता पण वेळ नव्हती’ अशीच काहीशी सुदैवी परिस्थिती यावेळी पाहायला मिळाली.
नेमकी घटना कशी घडली?
रविवारी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास जुहू येथील एका टर्फवर फुटबॉल खेळून टायगर आपल्या घरी निघाला होता. कारमध्ये बसण्यापूर्वी तो चाहत्यांचे अभिवादन स्वीकारत होता. तो गाडीत बसताच अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्या गाडीवर बेछूट गोळीबार केला. वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात धावपळ उडाली. घटनेची माहिती मिळताच जुहू पोलीस आणि गुन्हे शाखेची फॉरेन्सिक पथके तत्काळ घटनास्थळी दाखल झाली. पोलीसांनी संपूर्ण परिसर सील करून रस्त्यावरील वाहनांची कसून तपासणी सुरू केली असून, सांताक्रूझ येथून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.
अन् टायगरचा जीव वाचला….
फुटबॉल ग्राउंडजवळ उभ्या असलेल्या एका चाहत्याच्या मोबाइलमध्ये हा संपूर्ण गोळीबार कॅप्चर झाला आहे. या व्हिडिओमध्ये निळ्या रंगाचा शर्ट घातलेला एक हल्लेखोर टायगरच्या कारपासून अगदी एक-दोन फुटांच्या अंतरावर असल्याचे स्पष्ट दिसते. मात्र, नशीब बलवत्तर म्हणून त्याच क्षणी त्या हल्लेखोरावरचे पिस्तूल जाम झाले आणि गोळी अडकल्याने ती झाडलीच गेली नाही. तितक्यात कार पुढे सरकल्याने टायगर श्रॉफ थोडक्यात बचावला.
पोलीस ठाण्यापासून अवघ्या ३५० मीटर अंतरावर थरार
व्हिडिओ फुटेजवरून तिन्ही हल्लेखोर तरुण असल्याचे स्पष्ट होते. हल्ल्यानंतर आरोपी काही सेकंदांतच घटनास्थळावरून पसार झाले. विशेष म्हणजे, टायगरची कार बुलेटप्रूफ नव्हती आणि ज्या ठिकाणी हा गोळीबार झाला, तिथून जुहू पोलीस ठाणे केवळ ३५० मीटर अंतरावर आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
महिलेने सांगितला थरारक अनुभव
या हल्ल्याची प्रत्यक्षदर्शी असलेल्या सलमा या महिलेने तिच्या भेटीचा आणि घटनेचा थरारक अनुभव सांगितला. महिलेने सांगितले की, नेहमीप्रमाणे रविवारी ती टाइगर श्रॉफ आणि अभिषेक यांच्या ब्लॉगचे शूटिंग करण्यासाठी पोहोचली होती. मात्र, शूटिंगचे ठिकाण बदलल्यामुळे ती दोघांना रेकॉर्ड करू शकली नाही. याच दरम्यान अचानक तिला ४ ते ५ गोळ्या झाडल्याचा आवाज ऐकू आला. सुरुवातीला तिला वाटले की दिवाळीमुळे फटाके फुटत आहेत किंवा आनंदात हवेत गोळीबार सुरू आहे. परंतु, काही वेळानंतर जेव्हा कार थांबली आणि तिचा ड्रायव्हर जखमी अवस्थेत बाहेर आला, तेव्हा तिला घटनेच्या तीव्रतेची आणि गांभीर्याची जाणीव झाली.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर