ब्रेकिंग न्यूज
मारेगावात महाआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद Nanded Mukhed Flood News | महापुराला वर्ष पूर्ण!पूरग्रस्तांच्या अडचणी कायम IND vs SL : मोहम्मद सिराजची चूक अन् गोळीच्या स्पीडने ‘हेड शॉट’, थोडक्यात वाचला अंपायरला; जडेजाच्या काळजाचा … श्रावणात श्री क्षेत्र पांडवदेवीत भक्तांची अलोट गर्दी भाजपा मारेगाव शहर सरचिटणीसपदी रविंद्र टोंगे Nashik Crime : जेलमधून बाहेर येताच झाला गेम, भरदिवसा टपरीवर उभा असताना हल्ला अन् सुमित परागेला संपवलं! पैशांचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी पूजा; 15 वर्षीय मुलीसोबत घडणार होतं नको तेच, 15 जणांविरुद्ध गुन्हा पहाटे घराबाहेर पडताच तो मागे लागला; कॉलेजच्या वाटेत अडवलं अन् मुंबईत घडला भयंकर प्रकार IND vs SL Test : बॉलिंगने आग ओकणाऱ्या DSP सिराजचा बॅटिंगमध्ये जलवा; गगनचुंबी सिक्स पाहून श्रीलंका आवाक्, पा… पिसगाव येथे मिस्त्री कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या
SP News Maregaon

जांबमध्ये लोकसहभागातून 10 हजार वृक्षलागवडीचा संकल्प:शाश्वत पाण्यासाठी आळाचीवाडी पुरंदर, सातारा, चंद्रपूर, गावांच्या अभ्यासातून करणार जलसंधारणाची कामे‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


जिल्ह्यातील जांब गावाला हरित करण्यासह पाण्याबाबत स्वयंपूर्ण करण्यासाठी अमोल घायवट यांच्या पुढाकारातून पावसाळ्यात १० हजार झाडे लावण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला आहे. गत तीन वर्षात अकोट तालुक्यातील विविध गावांमध्ये वृक्षारोपण करणाऱ्या अमोल घायवट यांनी यावर्षी १००% फोकस केवळ जांब गावावर केंद्रित केला असून प्रत्येक घरासमोर, शाळा, मंदिरे, गावातील मोकळ्या जागा, शेतातील बांधावर १० हजार झाडे लावण्यात येणार आहे. गतवर्षी त्यांच्या माध्यमातून अकोट तालुक्यात ४९ गावे आणि ६७ शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले होते. परंतु, अनेक ठिकाणी योग्य संगोपन न झाल्याने केवळ २५% झाडेच जगली. त्यामुळे श्रम आणि वेळ वाया घालवण्यापेक्षा, केवळ जांब गावातच काम करून ८० ते ९० टक्के झाडे जगवण्याचा संकल्प करण्यात आला आहे. मोहिमेतंर्गत जांब गावातील सुमारे ४०० घरांमध्ये प्रत्येकी ३ झाडे दिली जाणार आहेत. ग्रामस्थांची मागणी व आवडीनुसार त्यांना कडुलिंब, सीताफळ, डाळिंब, बदाम आणि चिकू आदी फळझाडे पुरवली जातील, फळांच्या अपेक्षेने विद्यार्थी व ग्रामस्थ झाडांची आपुलकीने काळजी घेतील. झाडांच्या सुरक्षिततेसाठी “ट्री गार्ड’ दिले जाणार असून, सलग तीन ते पाच वर्षे झाडांचे उत्तम संगोपन करणाऱ्या कुटुंबांना बक्षीस देऊन गौरवण्यात येणार आहे. गावात भरपूर ऑक्सिजन व सावली मिळावी, यासाठी प्रत्येकाच्या दारात किमान एक कडुलिंबाचे झाड लावण्याचा संकल्प आहे. जलसंधारणातून अर्थकारण, स्थानिक रोजगार निर्मिती २०२२ मधील पाणी फाउंडेशनच्या कामातून प्रेरणा घेत घायवट यांनी वाहून जाणारे पावसाचे पाणी गावातच अडवून जिरवण्याचा ध्यास घेतला आहे. यामुळे बारमाही शेती शक्य होऊन गावाचे उत्पन्न वाढेल, असा त्यांचा विश्वास आहे. तसेच जलसंधारण कामातून गावातील २०-२५ बेरोजगार तरुणांना रोजगार देण्याचे घायवट यांचे नियोजन आहे. यासाठी त्यांनी आळाचीवाडी (पुरंदर) आणि सातारा (चंद्रपूर) या गावांना भेटी दिल्या असून तेथील अर्थकारण व जीवनमान उंचावल्याचे त्यांनी पाहिले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर