ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

आरोग्य शिबिरात महिलांची विक्रमी उपस्थिती:गरजू रुग्णांसाठी दिलासा, म.हो.फि.डॉ. असोसिएशन, संजीवन सोसायटीचा स्तुत्य उपक्रम‎

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


महाराष्ट्र होमिओ फिमेल डॉक्टर्स असोसिएशन व संजीवन सोशल डेव्हलपमेंट सोसायटी, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी १४ रोजी महादेव खोरी भागातील प्रभू येशू प्रार्थना भवन (रोही चर्च) येथे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विशेषत: महिलांचा या शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाला. एमएचएफडीए संस्थापक अध्यक्षा डॉ. रुपाली गोसावी, महासचिव डॉ. आरती नल्लू आणि स्टेट कोर कमिटी मेंबर डॉ. स्वाती पडोळे यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराच्या सुरुवातीला संजीवन सोशल डेव्हलपमेंट सोसायटीचे संस्थापक संजय दिवे व अस्मिता दिवे यांनी एमएचएफडीए अमरावतीच्या अध्यक्षा डॉ. प्रिया मोहोड यांचे पुष्पगुच्छ देऊन उत्साहात स्वागत केले. सकाळी ११.३० ते दुपारी २.३० या वेळेत चाललेल्या या शिबिरात परिसरातील नागरिकांनी विविध आरोग्य तपासण्या करून घेतल्या तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधही घेतले. या सेवाभावी शिबिराच्या यशस्वीतेसाठी संजीवन सोशल डेव्हलपमेंट सोसायटीचे संस्थापक पास्टर संजय दिवे, पास्टर अस्मिता दिवे यांच्यासह एमएचएफडीएच्या अध्यक्षा डॉ. प्रिया मोहोड, सहसचिव डॉ. वैशाली टेम्भे, सदस्य डॉ. प्रज्ञा घाटोळ, डॉ. सुजाता भगत, डॉ. नम्रता नानवानी, डॉ. रुद्रायणी सांगेकर, डॉ. सांची तितरे आणि डॉ. कुरेत खान यांनी उपस्थित राहून रुग्णांची तपासणी केली व मोलाचे योगदान दिले. गोरगरीब व गरजू नागरिकांसाठी आयोजित या शिबिराबद्दल महादेव खोरी परिसरातील नागरिकांनी दोन्ही संस्थांचे विशेष आभार यावेळी मानले आहेत. विविध आजारांवर मोफत औषधोपचार महिला, पुरुष, लहान मुले आणि वरिष्ठ नागरिकांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच गरजूंना जागेवरच मोफत औषधांचेही वाटप करण्यात आले. होमिओपॅथी औषध हे रुग्णांना बाहेरून आणावे लागू नये म्हणून त्यांना शिबिरातच औषध देण्यात आले. या ठिकाणी उच्च रक्तदाब, मधूमेह, तसेच महिलांच्या आरोग्यविषयक विविध समस्यांवर उपचार करण्यासाठी त्यांना औषध देण्यात आले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर