ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन सोहळा पुढे ढकलला:एनडीएच्या महत्त्वाच्या बैठकीमुळे तारखांमध्ये बदल, 10 ऐवजी 11 जूनला होणार!

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा यंदाचा 27 वा वर्धापन दिन एका दिवसाने पुढे ढकलण्यात आला असून, आता हा सोहळा गुरुवार, 11 जून रोजी दुपारी 2 वाजता मुंबईतील किंग्ज सर्कल येथील षण्मुखानंद सभागृहात पार पडणार आहे. दरवर्षी 10 जून रोजी साजरा होणाऱ्या या पक्षीय सोहळ्याच्या तारखेत नवी दिल्लीत ‘एनडीए’ची एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आल्याने बदल करण्यात आला आहे, अशी अधिकृत माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पक्षाची स्थापना 10 जून 1999 रोजी झाली असली तरी, यंदा याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत ‘एनडीए’ घटक पक्षांची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीला देशभरातील ‘एनडीए’चे सर्व प्रमुख घटक पक्ष, त्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि खासदार उपस्थित राहणार आहेत. महायुती आणि ‘एनडीए’चा एक महत्त्वाचा भाग असल्याने या राष्ट्रीय बैठकीला उपस्थित राहणे आवश्यक आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे 10 जून रोजी दिल्लीतील बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत. काय म्हणाले सुनील तटकरे? याबाबत माहिती देताना सुनील तटकरे म्हणाले, देशातील जनतेने सलग तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी आणि एनडीएला देशसेवेची संधी दिली आहे. जगभरात युद्धाचे सावट असतानाही भारताने केलेली प्रगती आणि एनडीए सरकारच्या मागील दोन वर्षांच्या पूर्ततेचा आढावा या बैठकीत घेतला जाईल. तसेच एनडीएच्या भक्कम एकसंघ वाटचालीचे मंथन या बैठकीत होणार आहे. दिल्लीतील बैठक पूर्ण करून सर्व नेते परतल्यानंतर, 11 जून रोजी दुपारी 2 वाजता षण्मुखानंद सभागृहातच हा सोहळा होईल. केवळ तारखेत बदल झाला असून जागा तीच आहे, असे तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. ‘दादांना समर्पण… संघर्ष आणि संकल्प’ सुनील तटकरे म्हणाले, माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर पक्ष पहिल्यांदाच आपला वर्धापन दिन साजरा करत आहे. अजित पवारांच्या निधनानंतर अतिशय संयमाने आणि धिरोदत्तपणे पक्षाची धुरा सांभाळत सुनेत्रा पवारांनी राष्ट्रीय अध्यक्षपद आणि राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. हा वर्धापन दिन ‘दादांना समर्पण… संघर्ष आणि संकल्प’ या विचाराने साजरा केला जाणार, अशी माहिती तटकरे यांनी दिली आहे. सुनेत्रा पवार लवकरच राज्यव्यापी दौरा करणार संघटनात्मक बांधणीबाबत बोलताना सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले की, 2029 च्या आगामी मोठ्या आव्हानांना पक्षाला ‘एनडीए’चा घटक म्हणून ताकदीने सामोरे जायचे आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या 50 टक्के आरक्षणाबाबतच्या निर्णयानंतर राज्यातील प्रलंबित जिल्हा परिषद निवडणुका ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान होण्याची दाट शक्यता असल्याने, राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांचा राज्यव्यापी दौरा लवकरच नियोजित करण्यात येत आहे. या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, बूथ पातळीपासून ते थेट देशपातळीपर्यंत पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक भक्कम करण्यावर आणि पक्ष विस्तारावर आमचे सर्वोच्च प्राधान्य असेल, असेही तटकरे यांनी यावेळी नमूद केले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर