ब्रेकिंग न्यूज
Eknath Shinde: सुप्रीम कोर्टात सुनावणी अन् एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत! पीएम मोदींची घेणार भेट, बैठकीचं कारण … IND vs SL : श्रीलंका क्रिकेटचा टीम इंडियासोबत ‘गोलीगत धोका’! गंभीरच्या लगेच लक्षात आला शातीर डाव, शुभमनचाही… Chandrpur: हॉस्टेलमध्ये पाचवीमध्ये शिकणाऱ्या 2 भावांवर मित्रांकडून अनैसर्गिक अत्याचार, चंद्रपूर हादरलं महायुती सरकारची मोठी घोषणा, तब्बल 30209 जागांसाठी जम्बो शिक्षक भरती, असा करा अर्ज! मोबाईलवर तो मेसेज आला अन् तिथंच बिझनेसमन फसला, छ. संभाजीनगरात अडीच तासांचा थरार, शेवटी… पोलीस भरतीचं स्वप्न अधूरंच राहिलं, धावण्याचा सराव करताना खाली कोसळला अन् घेतला शेवटचा श्वास शफीकचं शतक, साजिदची घातक बॉलिंग, पाकिस्तानचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय, WTC टेबलही हललं! एल निनोच्या पार्श्वभूमीवर मारेगाव तालुक्यात शेततळ्यांची वाटचाल द्राक्षाने बुडवलं, डाळिंबाने केलं मालामाल! शेतात असं टेक्निक वापरून सोलापूरच्या शेतकऱ्याने कमावले 42 लाख! Solapur: माझे फॉलोअर्स का कमी केले? इन्स्टा रिल्सवरून बिनसलं, तरुणासोबत भयंकर…, ‘त्या’ दाव्याने पोलिसही च…
SP News Maregaon

पवनराजे हत्याकांड प्रकरणी एकनाथ शिंदे ॲक्शन मोडमध्ये:थेट गृहमंत्री अमित शाहांशी चर्चा; CBI हायकोर्टात जाणार

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या काही तासांतच आता देशपातळीवर मोठ्या राजकीय आणि कायदेशीर घडामोडींना वेग आला आहे. या खटल्यातील माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींच्या निर्दोष मुक्तीच्या निकालाविरोधात केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) वरिष्ठ न्यायालयात (हायकोर्टात) अपील करणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या प्रकरणी सीबीआयला थेट दाद मागण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची अमित शहांची चर्चा
मुंबई सत्र न्यायालयाने पुरावे आणि साक्षीदारांच्या अभावामुळे सर्व आरोपींची सुटका केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. या निकालानंतर लगेचच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या संपूर्ण प्रकरणावर सखोल चर्चा केली. या उच्चस्तरीय बैठकीत खटल्याच्या कायदेशीर बाजू आणि पुराव्यांवर पुनर्विचार करण्यात आला. या चर्चेनंतर गृहमंत्री अमित शहा यांनी या निकालाला वरिष्ठ न्यायालयात आव्हान देण्याचे आणि भक्कमपणे बाजू मांडण्याचे आदेश तपास यंत्रणेला (CBI) दिले आहेत. भरदिवसा झाली होती पवनराजेंची हत्या तत्कालीन काँग्रेस (आय) पक्षाचे नेते पवनराजे निंबाळकर यांची ३ जून २००६ रोजी नवी मुंबईत भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हल्ल्यात त्यांचे वाहनचालकही मृत्युमुखी पडले होते. या दुहेरी हत्याकांडाने राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणाच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. ओमराजेंचा विश्वासघात झाला, परत यायचं असेल तर उद्धव ठाकरे निर्णय घेतील- अनिल देसाई या निकालानंतर ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार अनिल देसाई यांनी बंडखोर खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याबाबत महत्त्वपूर्ण विधान करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. “ओमराजे निंबाळकर यांचा विश्वासघात झाला आहे. त्यांना पुन्हा आमच्यासोबत यायचं असेल तर त्याबाबतचा अंतिम निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील,” असे देसाई यांनी स्पष्ट केले. कसली ही न्यायव्यवस्था? – अंबादास दानवे अंबादास दानवे म्हणाले की, पवनराजे निंबाळकर यांच्यासह एकाची राजकीय वैमनस्यातून निर्घृण हत्या होते आणि प्रकरणात ढीगभर पुरावे असतानाही आरोपी निर्दोष सुटतात. हा निकाल पाहून मनात संताप, चीड आणि अस्वस्थता याशिवाय काहीच उरत नाही. धाराशिवसह संपूर्ण महाराष्ट्राला या प्रकरणातील आरोपी कोण आहेत हे माहीत आहे. तरीही न्याय मिळत नाही, ही अत्यंत वेदनादायक बाब आहे. अशा निकालांमुळे सामान्य नागरिकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास डळमळीत होतो. आज प्रश्न फक्त एका खटल्याचा नाही, तर न्यायाच्या आहे, असे शिवसेना ठाकरे गटाचे नेते दानवे यांनी म्हटले आहे. संबंधित बातम्या वाचा… पवनराजे हत्याकांडातील सीबीआय कोर्टाचे 10 सर्वात मोठे खुलासे:माफीचा साक्षीदार अविश्वसनीय, मोबाईलचे सीडीआर गायब, अन् पोलिसांच्या घोडचुका महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाला हादरवून सोडणाऱ्या आणि गेल्या दोन दशकांपासून प्रलंबित असलेल्या बहुचर्चित पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा अखेर २० वर्षांनंतर निकाल लागला आहे. सीबीआय विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. आर. नावंदर यांनी माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आठ आरोपींची संशयाचा फायदा देत निर्दोष मुक्तता केली आहे. सीबीआय (CBI) कोर्टाने आपला ऐतिहासिक निकाल देताना तपास यंत्रणा, पोलीस आणि सीबीआयच्या अत्यंत ढिसाळ कारभारावर प्रचंड कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. या खटल्याचा संपूर्ण पाया ज्या ‘माफीच्या साक्षीदारावर’ उभा होता, त्यालाच न्यायालयाने अविश्वसनीय आणि सोयीनुसार खोटे बोलणारा ठरवले आहे. खासदार ओमराजे निंबाळकर आणि त्यांच्या कुटुंबासाठी हा एक मोठा कायदेशीर धक्का मानला जात आहे. न्यायमूर्ती एस. आर. नावंदर यांच्या कोर्ट क्रमांक ५५ मध्ये पार पडलेल्या या सुनावणीतील १० सर्वात मोठे खुलासे आणि कोर्टाची सविस्तर निरीक्षणे येथे वाचा संपूर्ण बातमी पवनराजे हत्याकांडाचा 20 वर्षांनंतर निकाल:पुराव्याअभावी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता; ओमराजे म्हणाले- निकाल दुर्दैवी, आता हायकोर्टात दाद मागणार राज्यातील बहुचर्चित आणि तब्बल 20 वर्षांपासून न्यायालयात प्रलंबित असलेल्या पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि राज्याचे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्वच्या सर्व आरोपींची न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायालयाने दिलेल्या या धक्कादायक निकालामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून, निंबाळकर कुटुंबासाठी हा फार मोठा धक्का मानला जात आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी ऑपरेशन टायगर संकटात:ओमराजे म्हणाले – शिंदेसेनेत जाण्याचा निर्णय अजून नाही, मतदारसंघात जावून चर्चा करून पुढचे ठरवणार! ‘पवनराजे हत्याकांडाच्या निकालाविरोधात हायकोर्टात जाणार आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याचा कोणातही निर्णय घेतलेला नाही. मतदारसंघात जावून मतदारांशी चर्चा करेन, त्यानंतर निर्णय घेईन,’ अशी प्रतिक्रिया ओमराजे निंबाळकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगरचे भवितव्य आता ओमराजे निंबाळकर यांच्या हाती आहे. तूर्तास तरी ऑपरेशन टायगर संकटात आल्याचे बोलले जात आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर