ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

अकोले आगार राज्यात प्रथम; पण दुर्गम भागातील विद्यार्थ्यांची पायपीट कायम:”जेथे उत्पन्न, तेथेच बस” धोरणाने आदिवासी भागातील शिक्षण धोक्यात‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


आदिवासीबहुल अकोले तालुक्यातील एसटी आगाराने महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या ‘क’ वर्ग गटात राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. मात्र, या प्रथम पारितोषिकाच्या आनंदावर तालुक्यातील अतिदुर्गम व आदिवासी भागातील दळणवळणाच्या विदारक वास्तवाने विरजण पाडले आहे. “जेथे उत्पन्न, तेथेच बससेवा’ हे ब्रीद घेऊन अकोले आगाराचा कारभार सुरू असल्याने, ग्रामीण भागातील विद्यार्थी, शेतकरी आणि कष्टकऱ्यांचे हाल गेल्या अनेक महिन्यांपासून सुरूच आहेत. तालुक्यातील अनेक आदिवासी गावे आणि वाड्या-वस्त्यांवरील एसटीच्या फेऱ्या बंद असल्याने शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दररोज ४ ते ६ किलोमीटर पायी जंगलवाट तुडवत शाळा गाठावी लागते. सध्या तालुक्यात बिबट्यांची संख्या झपाट्याने वाढली असून, हिंस्र श्वापदे आणि विषारी सापांच्या वावरामुळे लहान मुले जीव धोक्यात घालून शिक्षणाची पायपीट करत आहेत. वाहतुकीची सोय नसल्याने काही पालकांनी तर मुलांची शाळा बंद करण्याचा विचार सुरू केला आहे. जर असे घडले, तर अकोले आगाराचा हा प्रथम पुरस्कार केवळ कागदावरच राहील आणि दुर्गम भागातील शिक्षणाची ज्योत विझेल, अशी भीती व्यक्त होत आहे. खासगी जीपचे भाडे परवडत नसल्याने आदिवासी बांधवांना पायी चालण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. ‘शेवटच्या माणसापर्यंत एसटी पोहोचली का? हा प्रश्न आजही अनुत्तरीतच आहे. तालुक्यातील अतिदुर्गम भागांतून बसफेऱ्या बंद असल्याने हा प्रथम पुरस्कार कशासाठी? असा सवाल आदिवासी सेवक काशिनाथ साबळे, सुरेश भांगरे, सयाजी अस्वले व गंगाराम धिंदळे यांनी उपस्थित केला आहे. अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी बस स्वप्नच ग्रामीण भागांतील बससेवेअभावी आदिवासी विद्यार्थ्यांची ५ किमीची जीवघेणी पायपीट होतेय. पुरुषवाडी, बलठण, वांजुळशेत, माणिक ओझर, गोंदुशी, खडकी या डोंगराळ व जंगलव्याप्त भागांतील विद्यार्थी मवेशी येथील विद्यालयात येतात. अकोले आगाराने राज्यात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले असले तरीदेखील अतिदुर्गम आदिवासी भागांतील विद्यार्थ्यांसाठी सार्वजनिक बससेवा केवळ एक स्वप्नच ठरली आहे. – शांताराम काळे, सचिव, श्री स्वामी समर्थ विद्यालय, राजूर.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर