ब्रेकिंग न्यूज
⚡ शेताच्या बांधावरून थेट रुपेरी पडद्यावर! वेगावच्या अजय बदकी यांची ‘हुंकार’मधून दमदार एन्ट्री! ✦ ⚡ दुष्काळात बीडच्या शेतकऱ्यानं करून दाखवलं, 500 रुपयांच्या खर्चात मिळवलं तब्बल 32 क्विंटल सोयाबीनचे उत्पादन, … ✦ ⚡ लेकीच्या सुखासाठी कर्ज काढलं, पण जावई निघाला…, लग्नानंतर 4 महिन्यांत सगळं संपलं, संजनाचा आईला शेवटचा फोन … ✦ ⚡ Pawanraje Nimbalkar Murder Case : पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाला नवं वळण! पद्मसिंह पाटलांचा पाय खोलात? CB… ✦ ⚡ CRIME : फेसबूक LIVE सुरू असताना थरारक हत्याकांड! मेडिकल स्टोअरबाहेर पेटला वाद अन् ‘स्टिंग ऑपरेशन’ करताना झा… ✦ ⚡ Success Story : शेती करावी तर अशी, तीन पिकातून बीडच्या शेतकऱ्याचं पालटलं नशीब, वर्षाला 8 लाख कमाई, Video ✦ ⚡ IAS Tukaram Mundhe : MPSC चौकशी समितीवर नियुक्ती अन् FDA मधून बदलीची चर्चा; अखेर तुकाराम मुंढेंनी मौन सोडलं… ✦ ⚡ शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! कर्जमाफीच्या तिसऱ्या यादीत नाव असेल तर लगेच करा हे काम ✦ ⚡ Kolhapur Crime: एकत्रच जीव देणार होतो पण…, प्रियकराचा शॉकिंग खुलासा, कोल्हापूरला हादरवणाऱ्या प्रकरणात नेम… ✦ ⚡ Dhruv Rathee : मॅकेनिकल इंजीनियरिंग ते जर्मनीत उच्च शिक्षण! पाहा कसा आहे ध्रुव राठीचा शैक्षणिक प्रवास
SP News Maregaon

शिंदे सेनेत जाऊनही भालकेंची राजकीय कोंडी कायम:सात नगरसेवकांनी सोडली साथ, भाजपकडून अडवणूक सुरूच, पंढरपुरात नाट्यमय घडामोडी‎

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत बुस्टर डोस मिळालेल्या भालके गटाच्या अडचणी कमी होताना दिसेनात. एका बाजूला नगरपालिकेच्या विकास कामांसाठी सत्ताधारी पक्षात प्रवेश केलेला असताना दुसऱ्या बाजूला सहकारी नगरसेवक फोडण्याचे काम पडद्याआडून भाजप करीत आहे. त्याचबरोबर विकास निधीबाबत ही भाजपकडून अडचणी निर्माण केल्या जात आहेत. अशा बिकट परिस्थितीत नगराध्यक्ष प्रणिता भालके आणि भगीरथ भालके नेटाने पुढे जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. पंढरपूर तालुक्याच्या राजकीय पटलावर माजी आमदार प्रशांत परिचारक यांचा पांडुरंग परिवार आणि दिवंगत आमदार भारत भालके यांचा भालके गट सर्वात प्रभावशाली गट आहेत. दिवंगत कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक आणि दिवंगत भारत भालके यांच्या पश्चात या दोन्ही गटांमधील राजकीय संघर्ष कायम आहे. विधानसभा निवडणुकीत समाधान अवताडे यांच्या कमानीतून बाण सोडून परिचारकांनी भालके यांना दोन्ही वेळा पराभूत केले. तर भालके यांनी परिचारकांचा प्राण असलेल्या पंढरपूर नगरपालिकेत वर्मी वार केला आहे. प्रतिष्ठेचे नगराध्यक्ष पद जिंकून परिचारक यांच्या शिरपेचातील कोहिनूर काढून घेतला. मात्र त्याचवेळी भालके यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनाही अंगावर घेतले. याचा परिणाम म्हणून नगराध्यक्ष पद, ११ नगरसेवक जिंकल्यानंतर ही भालके यांना नगरपालिकेत सुखाने कारभार करता येत नाही. भगीरथ भालके, प्रणिता भालके यांनी त्यांच्या नगरसेवकांसह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. सत्तेच्या वळचणीला गेल्यानंतर तरी राजकीय उन्हाचे चटके शीतल होतील, अशी त्यांना अपेक्षा होती. परंतु भाजपने पडद्या आडून भालके यांच्या नगरसेवकात फूट पडण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. भालके गटाच्या ७ नगरसेवकांनी मागील दीड महिन्यापासून वेगळी भूमिका घेत प्रणिता भालके यांची कोंडी केली आहे. एका बाजूला परिचारक गट, दुसऱ्या बाजूला आपलेच सहकारी नगरसेवक विरोधात. भालकेंचे सात नगरसेवक भाजपकडे गेल्याने कोंडी या सगळ्या अडचणीवर मार्ग काढण्यासाठी दोन दिवसांपूर्वी भालके पती पत्नींनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. काही प्रलंबित कामांना गती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. रखडलेला यात्रा अनुदान निधी पदरात पाडून घेतले आहे. नगरपालिकेकडील १७ कोटींची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून परत नगरपालिकेकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. एकंदरीत भालके यांच्या समोरील राजकीय वाट सत्ताधारी पक्षात जाऊन ही सोपी झालेली नाही.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर