ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

आईच्या प्रेरणादायी जीवन प्रवासाला लेकीने दिले शब्दरूप:‘सोलीना’ पुस्तकाचे‎झाले थाटात प्रकाशन‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


लेखिका, पत्रकार डॉ. शुभांगी अरुण जोशी लिखित ‘सोलीना’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा झाला. या वेळी उद्योजक नितीन देशमुख, कल्पना देशमुख यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन केले . या वेळी विमल जोशी यांच्या सहस्त्र चंद्रदर्शन सोहळ्याचे औचित्यही साधले. ‘सोलीना’ हे पुस्तक डॉ. शुभांगी जोशी यांच्या स्व. मातोश्री विभावरी हिवरखेडकर यांच्या जीवनावर आधारित असून, एका सामान्य स्त्रीच्या असामान्य जीवनसंघर्षाची कहाणी यातून उलगडली. संघर्ष, त्याग, जिद्द, कुटुंबासाठीचे समर्पण, जीवनमूल्यांची जपणूक यांचा संगम या पुस्तकात अनुभवायला मिळतो. आईच्या स्मृतींना शब्दबद्ध करताना लेखिकेने भावनिकता, वास्तव यांचा समतोल साधल्याचे मत नितीन देशमुख यांनी व्यक्त केले. डॉ. शुभांगी जोशी या शिक्षण, साहित्य समाजप्रबोधन क्षेत्रात कार्यरत बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहेत. त्या इंग्रजीच्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. स्त्रीजीवन, सामाजिक परिवर्तन, साहित्य अभ्यास यावरील त्यांचे संशोधनउल्लेखनीय मानले जाते. सुधा मूर्ती यांच्या कादंबऱ्यांतील स्त्री पात्रांच्या परिवर्तनाचा अभ्यास यावर त्यांनी पीएच.डी. प्राप्त केली. प्रकाशन सोहळ्यात मान्यवरांनी ‘सोलीना’ या पुस्तकाचे कौतुक करत स्व. विभावरी हिवरखेडकर यांच्या जीवनाला शब्दरूप देण्याच्या लेखिकेच्या प्रयत्नांचे अभिनंदन केले. आईच्या जीवनसंघर्षातून प्रेरणा घेऊन पुढील पिढीपर्यंत संस्कार, मूल्ये, जिद्दीचा वारसा पोहोचविणारे हे पुस्तक आहे, असे मत अनेकांनी व्यक्त केले.यावेळी अरुण जोशी, डॉ. शुभांगी जोशी, विमल जोशी, संदीप हिवरखेडकर यांची उपस्थिती होती.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर