ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

आदिवासी कोळी जमातीला जातीचे दाखले:वैधताप्रमाणपत्र सहज मिळावे, जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला माेर्चा; जोरदार घोषणा

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


कोळी महादेव, मल्हार कोळी, टोकरे कोळी, ढोर कोळी व डोंगर कोळी या आदिवासी कोळी जमातीतील बांधवांना त्यांचे जातीचे दाखले व जात वैधता प्रमाणपत्र सुलभरीत्या मिळावे. या प्रमुख मागणीसाठी मंगळवारी धरणे आंदोलन करण्यात आले. कोळी महासंघातर्फे आंदोलन करीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनेही करण्यात आली. अनुसूचित जमातीतील प्रवर्गातील कोळी महादेव, मल्हार कोळी, टोकरे कोळी, डोंगर कोळी व ढोर कोळी या समाजबांधवांना जातीचे दाखले व जात वैधता प्रमाणपत्र सुलभरीत्या मिळावेत. रक्त नात्यातील नातेवाईकांना जात वैधता प्रमाणपत्र सहज प्राप्त व्हावे. यासाठी २० ऑक्टोबर २०२३ रोजी तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहावर महत्त्वाची बैठक पार पडली होती. सदर बैठकीमध्ये अनेक मंत्री, खासदार, आमदार, अतिरिक्त मुख्य सचिव, संबंधित विभागांचे सचिव, प्रशासनाचे अधिकारी व आदिवासी कोळी समाजाचे शिष्टमंडळ-प्रतिनिधी यांचा समावेश होता. बैठकीदरम्यान आदिवासी कोळी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांवर चर्चा झाली. विविध जिल्ह्यांमध्ये होणाऱ्या अन्नत्याग उपोषणांमध्ये व आंदोलनांमध्ये जातीचे दाखले व जात प्रमाणपत्राबाबतही प्रामुख्याने चर्चा झाली. त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात आला. मात्र त्यानंतर जातीचे दाखले व जात वैधता प्रमाणपत्र सहज मिळावे, हा मुद्दा मार्गी लागला नाही, असे कोळी महासंघाचे म्हणणे आहे. त्यामुळे १६ जून रोजी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी महासंघाचे युवा प्रदेशाध्यक्ष ॲड. चेतन पाटील, महासंघाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा माजी जि. प. सदस्य प्रा. सुरेश पाटकर, युवा कोळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष तुषार सिरसाट, प्रदीप कोंलेटेके, गजानन वानखडे, रमेश तरोडे, शरद आपोतीकर, ऋषिकेश बोपटे, राम पाटील भांडे, विद्या तरोडे, जयश्री आढे यांच्यासह आदिवासी कोळी समाजातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी अधिवेशनात मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलन कोळी महादेव जमातीला सुलभरीत्या व विनाअट जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र मिळत नसल्याने अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. याबाबत यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयासह अन्य ठिकाणी आंदोलने करण्यात आली. समाजबांधव उपोषणालाही बसले होते. आता धरणे आंदोलन करण्यात आले. त्यामुळे राज्य विधिमंडळाच्या आगामी पावसाळी अधिवेशनामध्ये आदिवासी कोळी समाजाचा प्रश्न मार्गी न लावल्यास संपूर्ण महाराष्ट्रभर माजी आमदार रमेश पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली कोळी महासंघ तीव्र आंदोलन सुरू करेल, असा इशाराही महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर