ब्रेकिंग न्यूज
Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक
SP News Maregaon

अमोल कोल्हेंचा मोठा निर्णय:’मी सावित्रीबाई जोतिराव फुले’ मालिका नव्या प्लॅटफॉर्मवर; जाणून घ्या कधी अन् कुठे पाहता येणार?

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मराठी छोट्या पडद्यावर गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत असलेली ‘मी सावित्रीबाई जोतिराव फुले’ ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. व्यावसायिक टीआरपीचे कारण पुढे करत स्टार प्रवाह वाहिनीने ही मालिका अवघ्या 152 भागांमध्येच अचानक गुंडाळल्यामुळे प्रेक्षक, कलाकार आणि राजकीय वर्तुळातून तीव्र संताप व्यक्त होत होता. मात्र, ‘शो मस्ट गो ऑन’ म्हणत या मालिकेचे निर्माते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी एक अत्यंत मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. ही मालिका आता एका नवीन डिजिटल प्लॅटफॉर्मवर दिमाखात सुरू होणार आहे. 20 जूनपासून ‘मराठी वारसा’ युट्यूब चॅनेलवर प्रीमियर अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियाद्वारे प्रेक्षकांना ही बातमी दिली आहे. आगामी 20 जून रोजी संध्याकाळी ठीक 6 वाजता या मालिकेचा भव्य प्रीमियर होणार असून, ही मालिका आता ‘मराठी वारसा’ या युट्यूब चॅनेलवर प्रेक्षकांना मोफत पाहता येणार आहे. मराठी मनोरंजन विश्वाच्या इतिहासात टीव्हीवरून बंद पडलेली मालिका थेट युट्यूबवर त्याच भव्यतेत सुरू करण्याचा हा पहिलाच क्रांतिकारी प्रयोग मानला जात आहे. दर बुधवार आणि शनिवारी येणार नवे भाग मालिकेच्या पुढील प्रसारणाचे वेळापत्रक जाहीर करताना अमोल कोल्हे म्हणाले की, “आता दर आठवड्याला दोन दिवस, म्हणजेच प्रत्येक बुधवारी आणि शनिवारी या मालिकेचे नवीन भाग प्रेक्षकांच्या भेटीला येतील. चॅनलने जिथे मालिका संपवली होती, तिथून पुढचा संपूर्ण इतिहास आणि स्त्री साक्षरतेचा धगधगता महायज्ञ आम्ही तुमच्यासमोर घेऊन येत आहोत. हा आपला इतिहास आणि अभिमान आहे, तो लोकांपर्यंत पोहोचलाच पाहिजे.” महाराष्ट्राचा डीएनए रडणारा नाही, लढणारा वाहिनीच्या निर्णयाला न जुमानता घेतलेल्या या भूमिकेबद्दल बोलताना अमोल कोल्हे भावुक आणि आक्रमक झाले. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं मी हे शिवधनुष्य उचलतोय. वाहिनीने मालिका बंद केल्यावर प्रेक्षकांच्या मनात जी खदखद होती, तिला न्याय देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. शेवटी महाराष्ट्राचा डीएनए हा रडणारा नाही तर लढणारा आहे,” अशा कडक शब्दांत त्यांनी चॅनलच्या व्यावसायिक धोरणांना सणसणीत टोला लगावला आहे. महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा!: बचत गटांना मिळणार 1 हेक्टर जमीन, सोबत 1 लाखांचे अनुदान राज्यातील महिला बचत गटांसाठी राज्य सरकारने मोठी आणि महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे. महसूल विभागाच्या पडीत जमिनींचा उपयोग करून महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक पात्र महिला बचत गटाला एक हेक्टर (सुमारे अडीच एकर) जमीन पाच वर्षांच्या लीजवर देण्यात येणार आहे. याशिवाय प्रत्येक गटाला एक लाख रुपयांचे अनुदानही दिले जाणार असल्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासोबतच पडीत सरकारी जमिनींचे संरक्षण आणि उत्पादनक्षम वापर हा या योजनेमागील प्रमुख उद्देश असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. सविसर वाचा

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर