ब्रेकिंग न्यूज
Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक
SP News Maregaon

कारची काच फोडून 10 लाख पळवणारी आंतरराज्य टोळी गजाआड:हिंगोली गुन्हे शाखेची आंध्रप्रदेशात धडक कारवाई

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


वसमत शहरात वडिलांच्या ऑपरेशनसाठी बँकेतून काढलेली दहा लाख रुपयांची रोकड कारची काच फोडून लंपास करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छडा लावला असून आंध्र प्रदेशातील दोन आरोपींना त्यांच्या मूळ गावावरून शनिवारी ता. 20 अटक केली आहे. त्यांच्याकडून 5 लाख रुपये जप्त करण्यात आले आहे. 11 दिवसांत तब्बल 70 ठिकाणी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून चोरट्यांचा छडा लावण्यात आला. वसमत तालुक्यातील पळसगाव येथील प्रशांत डाखोरे यांनी ता. 9 जून रोजी वडिलांच्या ऑपरेशनसाठी युनीयन बँकेतून 10 लाख रुपयांची रक्कम काढली होती. सदर रक्कम कारमध्ये ठेऊन ते परत बँकेत गेले असता चोरट्यांनी कारची काच फोडून 10 लाख रुपये असलेली बॅग पळविली. या प्रकरणी वसमत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, अपर पोलिस अधीक्षक कमलेश मिना यांनी तातडीने गुन्हे शाखेचे पथक नियुक्त केले. यामध्ये पोलिस निरीक्षक मोहन भोसले, पोलिस उपनिरीक्षक माधव जिव्हारे, जमादार भुजंग कोकरे, शिवाजी जालमीरे, किशोर सावंत, विशाल खंडागळे, आजम प्यारेवाले, ज्ञानेश्वर गोरे, साईनाथ कंठे, मुनिर मुन्नीवाले, शंकर हराळ, दत्ता नागरे, प्रदीप झुंगरे यांचा समावेश होता. या पथकाने घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यातून दुचाकीवर आलेल्या चोरट्यांची ओळख पटण्यास मदत झाली. त्यानंतर पोलिसांनी सलग आकरा दिवस वसमत, नांदेड, पूर्णा भागासह आंध्रप्रदेशच्या सिमेवरील काही गावांत एकूण 70 सीसीटीव्ही फुजेटची तपासणी केली. यामध्ये चोरट्यांची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी थेट तिपा बिटरगुंडा जि. नेल्लोर गाठले. त्या ठिकाणी पोलिसांनी प्रदीप राजू राजू पेटला, व मधु जवळा भास्कर या दोघांना पकडले. पोलिसांनी त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरलेल्या 10 लाख रुपयांपैकी 5 लाख रुपये जप्त केले,. उर्वरित रकमेचा शोध सुरू असून या टोळीने इतर जिल्ह्यांमध्येही अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत का, याचा तपास पोलिस करीत आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर