ब्रेकिंग न्यूज
Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक
SP News Maregaon

राज्याच्या आरोग्य सेवेत आता ‘एआय’चा वापर:आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विभागाची बैठक

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्याच्या सार्वजनिक आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी आणि ती अधिक लोकाभिमुख करण्यासाठी आता ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’चा प्रभावी वापर केला जाणार आहे. राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी याबाबतची माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ‘वर्षा’ निवासस्थानी आरोग्य विभागाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी आरोग्य यंत्रणेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या सूचना दिल्या असून, यामुळे रुग्णांना जलद आणि अचूक सेवा मिळण्यास मदत होणार आहे. या बैठकीत ‘समग्र’ संस्थेच्या वतीने आरोग्य सेवेच्या बळकटीकरणासाठी विशेष सादरीकरण करण्यात आले. यामध्ये शासकीय आरोग्य संस्थांचे त्यांच्या कामगिरीनुसार स्टार रेटिंग ठरवणे, नियमित आरोग्य समीक्षा करणे, आरोग्य हेल्पलाइन अधिक सक्षम करणे आणि कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण यांसारख्या महत्त्वाच्या बाबींचा समावेश होता. तंत्रज्ञान आणि मानवी सेवा यांचा योग्य मेळ घालून आरोग्य व्यवस्था अधिक कार्यक्षम करण्यावर या बैठकीत भर देण्यात आला. राज्याच्या आरोग्य विभागाला बळकट करण्यासाठी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी मांडलेल्या विविध मागण्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या बैठकीत ‘आपले गाव, आरोग्य संपन्न गाव’ योजनेची अंमलबजावणी, पॉलिएटिव्ह केअर आणि सिकलसेल नियंत्रणाबाबत चर्चा झाली. विशेषतः वैद्यकीय अधिकारी भरती प्रक्रिया सुलभ करणे, डॉक्टरांच्या मानधनात वाढ करणे आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे समावेशन प्रक्रिया गतिमान करणे, या मागण्यांवर भर देण्यात आला. तसेच प्रशासकीय सुसूत्रतेसाठी आयुष, प्रशिक्षण आणि नर्सिंग या विभागांसाठी स्वतंत्र संचालक पदे निर्माण करण्याची मागणीही करण्यात आली. यावर मुख्यमंत्र्यांनी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची ग्वाही दिली. या महत्त्वपूर्ण बैठकीसाठी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यामध्ये मुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव डॉ. निपुण विनायक व ई. रवींद्रन, तसेच वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार उपस्थित होते. याशिवाय आरोग्य सेवा आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, ‘समग्र’ संस्थेचे प्रतिनिधी गौरव गोयल आणि आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभागातील इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही या चर्चेत सहभाग घेतला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर