ब्रेकिंग न्यूज
⚡ शेताच्या बांधावरून थेट रुपेरी पडद्यावर! वेगावच्या अजय बदकी यांची ‘हुंकार’मधून दमदार एन्ट्री! ✦ ⚡ दुष्काळात बीडच्या शेतकऱ्यानं करून दाखवलं, 500 रुपयांच्या खर्चात मिळवलं तब्बल 32 क्विंटल सोयाबीनचे उत्पादन, … ✦ ⚡ लेकीच्या सुखासाठी कर्ज काढलं, पण जावई निघाला…, लग्नानंतर 4 महिन्यांत सगळं संपलं, संजनाचा आईला शेवटचा फोन … ✦ ⚡ Pawanraje Nimbalkar Murder Case : पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाला नवं वळण! पद्मसिंह पाटलांचा पाय खोलात? CB… ✦ ⚡ CRIME : फेसबूक LIVE सुरू असताना थरारक हत्याकांड! मेडिकल स्टोअरबाहेर पेटला वाद अन् ‘स्टिंग ऑपरेशन’ करताना झा… ✦ ⚡ Success Story : शेती करावी तर अशी, तीन पिकातून बीडच्या शेतकऱ्याचं पालटलं नशीब, वर्षाला 8 लाख कमाई, Video ✦ ⚡ IAS Tukaram Mundhe : MPSC चौकशी समितीवर नियुक्ती अन् FDA मधून बदलीची चर्चा; अखेर तुकाराम मुंढेंनी मौन सोडलं… ✦ ⚡ शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! कर्जमाफीच्या तिसऱ्या यादीत नाव असेल तर लगेच करा हे काम ✦ ⚡ Kolhapur Crime: एकत्रच जीव देणार होतो पण…, प्रियकराचा शॉकिंग खुलासा, कोल्हापूरला हादरवणाऱ्या प्रकरणात नेम… ✦ ⚡ Dhruv Rathee : मॅकेनिकल इंजीनियरिंग ते जर्मनीत उच्च शिक्षण! पाहा कसा आहे ध्रुव राठीचा शैक्षणिक प्रवास
SP News Maregaon

झाडे लावा, प्लास्टिक टाळाचा गजर; शाहू विचारांनी दुमदुमले केडगाव:महाराणी ताराबाई कन्या विद्यालयात मिरवणूक; 110 गरजू विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्य वाटप‎

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राजर्षी शाहू शिक्षण प्रसारक मंडळ संचलित केडगाव येथील महाराणी ताराबाई कन्या विद्यालयात छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची जयंती आणि सामाजिक न्याय दिन विविध समाजोपयोगी उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. सामाजिक समता, शिक्षण, स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या उपक्रमांमुळे संपूर्ण परिसर शाहू विचारांनी दुमदुमून गेला. यानिमित्त विद्यालयाच्या वतीने केडगाव ते शाहूनगर परिसरात भव्य जनजागृती मिरवणूक काढण्यात आली. विद्यार्थिनींनी छत्रपती राजर्षी शाहू महाराज आणि मावळ्यांची वेशभूषा करून आकर्षक जिवंत देखावे सादर केले. हातामध्ये सामाजिक संदेशांचे फलक घेऊन विद्यार्थिनींनी परिसरात प्रभावी प्रबोधन केले. सामाजिक बांधिलकी जपत विद्यालयाच्या वतीने ११० गरजू विद्यार्थिनींना शालेय गणवेश, बूट व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. तसेच इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थिनींचा आणि ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ मिळाल्याबद्दल प्राचार्या वासंती धुमाळ यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष रमेश बजाबा गवळी होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून व्याख्याते महेश डाळिंकर उपस्थित होते. डाळिंकर म्हणाले, शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नसून ती निर्णयक्षमता आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देणारी प्रक्रिया आहे. डिजिटल युगात ऑनलाइन शिक्षणाचा सुजाण व मर्यादित वापर व्हावा. रमेश गवळी यांनी शाहू महाराजांच्या दूरदृष्टीचा गौरव करत त्यांचे विचार समाजात रुजविणे हीच खरी आदरांजली असल्याचे सांगितले. प्रास्ताविक नामदेव वायळ यांनी, पाहुण्यांचा परिचय संजयकुमार निक्रड यांनी, र राजश्री पालवे यांनी शाहू महाराजांच्या जीवनकार्याचा परिचय करून दिला. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष भास्कर जासूद, सचिव बबन कोतकर यांच्यासह अनेक पदाधिकारी, नगरसेविका वर्षा काकडे, मुख्याध्यापिका रेणुका म्हस्के उपस्थित होते. सूत्रसंचालन समृद्धी लटके व छाया सुंबे यांनी, तर आभार प्राचार्या वासंती धुमाळ यांनी मानले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर