ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

जिल्ह्यात आठ महिन्यात बिबट्यांकडून 33 जीवघेणे हल्ले:10 जणांचा मृत्यू, 34 बिबट्यांचा वनविभागांत मुक्काम, महिनाभरात 17 बिबटे जेरबंद‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


श्रीरामपूर तालुक्यातील खैरी निमगांव येथील दादासाहेब येलम यांच्या पेरू फळबाग परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा संचार सुरू होता. यापार्श्वभूमीवर वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात एक बिबट्या जेरबंद झाला. तर दुसरा बिबट्या कोपरगाव तालुक्यात पडेगाव येथे, जेरबंद झाला. श्रीरामपूर वन विभाग तसेच वाइल्ड लाईफ रेस्क्यू टीम यांच्याशी संपर्क साधला. यानंतर वनविभागातील वनरक्षक अक्षय बडे, वनपाल विलास डगळे, रेस्क्यू टीमचे प्राध्यापक रोहित बकरे, तुषार बनकर, आजित परांडे, सार्थक शिंदे व अक्षय अभंग आदींनी माग काढून पिंजरा लावला होता. त्यात बिबट्या अडकला. कोपरगाव तालुक्यातील निमगाव खैरी येथे अण्णासाहेब शिंदे यांच्या शेतात पिंजरा लावला होता. सोमवारी (१५ डिसेंबर) सात वाजेच्या सुमारास बिबट्याची मादी पिंजऱ्यात जेरबंद झाली. दीपक कांबळे | अहिल्यानगर जंगलातील बिबटे ऊसात, स्थिरावले अन् आता ते थेट घरापर्यंत येऊन आपल्याच लेकरांना उचलून नेत आहेत. ही गंभीर स्थिती संतापजनक आहे. मागील तीन वर्षांत झालेल्या हल्ल्यांचा आकडा पाहता, मागील आठ महिन्यांत सर्वाधिक १० मृत्यू झाले. दारात खेळणारी मुले, शेतात काम करणाऱ्या वृद्ध महिला व शेतकऱ्यांना बिबट्यांकडून लक्ष केले जात आहे. त्यामुळे कृषीप्रधान जिल्ह्यातली शेती उध्वस्त होण्याची धास्ती आहे. वाढता संताप अन् विरोध पाहता, वनविभागाकडून हल्लेखोर बिबट्यांची धरपकड सुरू आहे. एक नरभक्षक ठार केला असून, विविध ठिकाणांहून रेस्क्यू केलेल्या बिबट्यांची संख्या ३४ वर पोहोचली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात ९७० गावांमध्ये बिबट्यांचा वावर आहे, हे बिबटे जंगल क्षेत्रात नव्हे, तर लोकवस्तीवर तसेच शेतात वास्तव्य करत आहेत. नागरिकांच्या मागणीनुसार लावलेल्या पिंजऱ्यातही बिबटे जेरबंद होत आहेत. नोव्हेंबर ते डिसेंबर २०२५ या कालावधीत सुमारे १७ बिबटे जेरबंद झाल्याचे समोर आले. त्यात अहिल्यानगर तालुक्यात कर्जुने खारे २, तपोवन १, पारनेर तालुक्यात २, मिरजगाव १, संगमनेर १, श्रीरामपूर ४, कोपरगाव ३, राहुरी ४, ठार १, याव्यतिरिक्त जखमी आढळून आलेले बिबटे ताब्यात घेतले असून, ही संख्या वाढती आहे. दरम्यान, एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत बिबट्यांनी केलेल्या ३३ गंभीर हल्ल्यांच्या घटनेत १० मृत्यू व २३ गंभीर जखमी झाले आहेत. कुठे किती बिबट्यांचा मुक्काम {संगमनेर : 4 {अकोले : 20 {राहुरी : 10 ^ जेरबंद झालेले बिबटे वनताराकडे पाठवण्याबाबत आपण यापूर्वीच प्रस्ताव दिला आहे. त्यानंतरही हल्ल्याच्या घटना सुरू असून बिबटे जेरबंद केले जात आहेत. बिबटे स्थलांतरासाठी नाशिकमार्फत नागपूर कार्यालयाकडे मंजुरीसाठी प्रस्ताव दिला आहे. सद्यस्थितीत सुमारे ३४ बिबटे वनविभागाकडे झाले आहेत. धर्मवीर सालविठ्ठल, उपवन संरक्षक. . २०२३-२०२४ – ४ (३३ जखमी) . २०२४-२०२५ – ८ (४७ जखमी) . २०२५-२०२६ – १० (२३ जखमी) लालफितीत अडकलाय स्थलांतराचा प्रस्ताव जिल्ह्यात विहिरीत पडून अथवा अपघातात जखमी होऊन बचावलेले बिबटे, जेरबंद झालेले बिबटे संबंधित क्षेत्रीय कार्यायात ठेवण्यात आले आहेत. या बिबट्यांची संत्या ४० पर्यंत पोहोचली. पहिल्या टप्प्यात २३ बिबटे वनताराला पाठवण्याबाबत नागपूर प्रधान वनसंरक्षकांकडे प्रस्ताव महिनाभरापूर्वीच पाठवला. परंतू, हा प्रस्ताव लालफितीत अडकला असून, त्यावर सकारात्मक निर्णय झाला नाही. त्यामुळे हे बिबटे रेस्क्यू सेंटरविना जिल्ह्यात ठेवावे लागत आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर