ब्रेकिंग न्यूज
10 सेकंदांचा थरार! लिफ्टमध्ये वर जाताना अचानक बसले भूकंपाचे धक्के, नाशिकमधील घटना CCTV कॅमेऱ्यात कैद CRIME : गँगवॉरने नांदेड हादरलं! दोघं दबा धरून बसले, गाडी पेट्रोल पंपावर वळली अन् सांडला रक्ताचा सडा; इंद्रज… Ravindra Jadeja : ड्रेसिंग रूमममध्ये रविंद्र जडेजाने असं काय केलं की, गंभीर खळखळून हसला; Video आला समोर मारेगावच्या हेमंतची UPSC-CAPF मध्ये दमदार भरारी! Success Story : नोकरीच्या मागे न लागता घेतला व्यवसायाचा निर्णय, बंदिस्त शेळीपालन केलं यशस्वी, वर्षाला 7 लाख… पश्चिम बंगालच्या उपसागरात घोंगावतंय मोठं संकट, विदर्भ-मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा अलर्ट, हवामान विभागाने … CRIME : बालपणापासून जिवाभावाच्या मैत्रिणी अन् एकत्र मृत्यूला कवटाळलं! नातेवाईकांकडे दुपारी जेवण अन् 4 तासात… Eknath Shinde: सुप्रीम कोर्टात सुनावणी अन् एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत! पीएम मोदींची घेणार भेट, बैठकीचं कारण … IND vs SL : श्रीलंका क्रिकेटचा टीम इंडियासोबत ‘गोलीगत धोका’! गंभीरच्या लगेच लक्षात आला शातीर डाव, शुभमनचाही… Chandrpur: हॉस्टेलमध्ये पाचवीमध्ये शिकणाऱ्या 2 भावांवर मित्रांकडून अनैसर्गिक अत्याचार, चंद्रपूर हादरलं
SP News Maregaon

आम्ही कामाचे प्रेझेंटेशन दिले, आता तुम्ही दाखवा:आदित्य ठाकरेंचे भाजपला थेट आव्हान; मुंबईसाठी केलेल्या कामांचा मांडला लेखाजोखा

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजताच मुंबईत राजकीय वातावरण तापले असून, मंगळवारी वरळी डोम येथे पार पडलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या मेळाव्यात आमदार आदित्य ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला. ठाकरेंनी मुंबईसाठी काय केले? असा प्रश्न विचारणाऱ्या विरोधकांना आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील विकासकामांचे प्रेझेंटेशन सादर करून सडेतोड उत्तर दिले. आम्ही केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला आहे, आता भाजपच्या नेत्यांनीही हिंमत दाखवून त्यांनी केलेल्या कामांचे असेच सादरीकरण करावे, असे थेट आव्हान आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिले. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी भाजपवर श्रेयवादावरून आणि पालिकेच्या तिजोरीवरून जोरदार हल्लाबोल केला. बीडीडी चाळ पुनर्विकास आणि कोस्टल रोड हे प्रकल्प आपल्याच काळात मार्गी लागले, मात्र त्याचे श्रेय भाजपने लाटल्याची टीका त्यांनी केली. तसेच पालिकेच्या आर्थिक स्थितीवर बोट ठेवताना ते म्हणाले, 2022 पर्यंत आम्ही मुंबई महापालिकेच्या 92 हजार कोटी रुपयांच्या ठेवी सुरक्षित ठेवल्या होत्या. मात्र, गेल्या तीन वर्षांत सत्तेत असलेल्यांनी या ठेवी साफ केल्या असून, मुंबईकरांच्या पैशांची उधळपट्टी केली आहे. पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, गेल्या वेळी वरळीमध्येच आपण व्होट चोरीवर बोललो होतो. त्यानंतर प्रत्येक शाखेत चांगल काम झाले आणि दुबार मतदार समोर आले. ⁠निवडणुक कधी जाहीर होणार याकडे आपण 4 वर्षे वाट पाहत होतो. आता 25 वर्षात आपण जे काम केले ते आपल्याला घरोघरी घेऊन जायचे आहे. ⁠वरळी डोम देशातील सर्वात मोठे आणि पहिले कोव्हीड सेंटर होते. त्यावेळी ⁠आपण होर्डिंग्ज लावले नाहीत तर जीव वाचवले. ⁠बीकेसीत आपण फिल्ड हॉस्पिटल सुरु केले. ⁠फेसबुक लाईव्ह होते, कारण लोकांनी प्रश्न उपस्थित केला की कोरोना काळात तुम्ही कोणाला भेटत नाही, मग पत्रकार परिषदेला पत्रकारांना कशाला बोलवता? त्यामुळे फेसबुक लाईव्ह सुरु केले. त्यानंतर पंतप्रधान मोदींनीही फेसबुकवरून संवाद सुरू केला. इतर राज्यांपेक्षा आपल्या ठेवी चांगल्या होत्या. ⁠मुंबईचे काम थांबले नव्हते. आम्ही मुंबईकरांवर ⁠कोणताही टॅक्स लावला नाही. 2022 साली ज्यांनी आपले सरकार पाडले आणि अॅनाकोंडाला सोबत घेतले, त्यांनी मुंबईची तिजोरी साफ केली. त्यांच्या काळात काहीही काम झाले नाही. मुंबईवरील कर्ज आता अडीच लाख कोटी रुपये इतके आहे, असा हल्लाबोल आदित्य ठाकरेंनी केला. उद्धव ठाकरेंनी शिक्षणात डिजिटलची नवी भाषा आणली आदित्य ठाकरे म्हणाले, आपल्या सत्तेच्या काळात मुंबईत शिक्षणाचा नवा अध्याय लिहिला गेला. मुंबईत 1000 हून अधिक शाळा सुरू झाल्या. त्यामध्ये 3 लाख विद्यार्थी शिकतात. एकून 2500 डिजिटल क्लासरुम सुरू झाले. ⁠उद्धव ठाकरे यांनी शिक्षणात डिजिटलची नवी भाषा आणली. मुंबई महापालिकेत आयसीसी आणि इतर महत्वाचे बोर्ड आणले. ⁠भाजप विचारते की तुम्ही काय केले, आता त्यांना सांगा आम्ही काय केले ते. ⁠भाजप आणि शिक्षणाचा काहीही संबंध नाही. महापालिकेच्या माध्यमातून ⁠मेडिकल सेंटर आणि नर्सिंग होम सुरू केले. त्या माध्यमातून ⁠देशभरातील लोकांना आपण आरोग्याच्या सुविधा देतो. बेस्टचे सध्याचे दर किती वाढले आहेत. ⁠सर्वात स्वस्त पाणी मुंबई महानगरपालिका देते. ⁠स्वत:ची धरण व्यवस्था असणारी मुंबई ही एकमेव महापालिका आहे. या ठिकाणी ⁠आपला महापौर बसेल त्यावेळी समुद्राचे पाणी गोड करण्याचा प्रकल्प पुन्हा सुरू करणार. ⁠सरकार पडले नसते तर हा प्रकल्प पूर्ण झाला असता. मुंबईची ब्रँड अम्बेसेडर पेंग्विनला केले पाहिज. त्यांना आपण जिवंत ठेवले. त्या माध्यमातून 2023 मध्ये 123 कोटी रुपये महापालिकेला मिळवून दिले आहेत. ⁠हजारो हेक्टरवरील मॅग्रुव्हजला आपल्या सरकारच्या काळात संरक्षण दिल्याचे आदित्य ठाकरेंनी म्हटले. कचऱ्याच्या टेंडरमधील घोटाळा समोर आणणार आदित्य ठाकरे म्हणाले, पावसाळा आला की मिडियाचे कॅमेरे मुंबईकडे जायचे. ⁠हिंदमाता आणि मिलन सबवे या ठिकाणी टँक बनवले त्याचा फायदा होतोय. ⁠या ठिकाणचे पंप चालू ठेवावे लागतात. ⁠मात्र मागच्या वेळी मी पाहिले की सिस्टम आहे, पण डिझेल नाही म्हणून पंप बंद आहे आणि त्यामुळे पाणी साचले. एसटीपीसाठी केंद्राचा निधी आला नाही तर आपल्या महानगरपालिकांचा निधी होता. कचऱ्याच्या टेंडरमध्येही घोटाळा आहे आणि तोही लवकरच समोर आणणार आहोत. मुंबई हवामान बदल कृती आराखडा झाला असता तर आज मुंबई प्रदूषण मुक्त झाली असती. कोस्टल रोडची पहिली घोषणा उद्धव ठाकरेंनी केली मुंबई महापालिकेत 500 स्क्वेअर फुटांपर्यंत आपण टॅक्स माफ केला. आता 700 स्क्वेअर फुटपर्यंत माफ करण्याची वेळ आली. ⁠बीडीडी चाळ पुनर्विकास आपण केले होते. 2016 साली फडणवीस मुख्यमंत्री होते, त्यावेळी त्यांनी घाईत उद्घाटन केले. ⁠मात्र पुढे काहीच झाले नाही. ⁠आपण काम सुरु केले आणि तीन वर्षात काम पूर्ण झाले. वरळी शिवडी कनेक्टरचे काम आपल्या काळात 48 टक्के पूर्ण केले. आता अडीच वर्षात फक्त 9 टक्के काम झाले. ⁠अटल सेतूचे काम आपल्याच काळात 82 टक्के काम पूर्ण झाले. कोस्टल रोडचे क्रेडिट मुख्यमंत्री यांनी घेतले. पण 2013 मध्ये कोस्टल रोडची पहिली घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली होती. ⁠काल मिंधेने प्रेझेंटेशन दिले, तेही आपलेच चोरले. ⁠खोटे बोलायचे कसे ते भाजपकडून शिकावे. ⁠ही सगळी कामे आम्ही केली, त्याचे केड्रिट घेऊ नका. ⁠नोटबंदी, रुपया पडण्याचे क्रेडिट तुम्ही घेतले नाही, आता आमच्या कामाचे क्रेडिट घेऊ नका, असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला. मी जसे कामाचे प्रेझेंटेशन दिले आहे तसे भाजपच्या नेत्यांनी येऊन काय केले ते सांगावे. त्यांनी सर्व विकास कामांच्या परवानग्या रोखून ठेवल्या होत्या.⁠फडणवीस साहेब कुठे दिसतात का? भाजपचे नशीब चांगले आहे, फक्त फित कापण्याचे काम त्यांनी केले, अशी टोलेबाजी आदित्य ठाकरेंनी यावेळी केली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर