Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

1,64,532 मतदार वाढल्याने शहरामध्ये नव्याने 53 मतदान केंद्रांची भर:एकूण मतदान केंद्र 876, 2017 मध्ये होते 735 मतदान केंद्र

महानगर पालिकेची अंतिम मतदार यादी १५ रोजी उशिरा रात्री घोषित करण्यात आली. यात मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. प्रारूप मतदार यादीत एका प्रभागातून १ ते ४ हजार मतदारांची नावे अन्य प्रभागांमध्ये गेली होती. ती मूळ प्रभागात आणण्याचा प्रयत्न झाला असला तरी काही मोजकी नावे अजुनही मूळ प्रभागात आली नसल्याने या मतदार यादीबाबत मतदारांमध्ये नाराजी आहे. अंतिम मतदार यादीचा विचार करता २०१७ च्या मनपा निवडणुकीच्या तुलनेत यंदा १ लाख ६४ हजार ५३२ मतदार वाढले आहेत. २०१७ मध्ये ५ लाख १२ हजार ६४८ मतदार होते. यंदा ६ लाख ७७ हजार १८८ मतदार आहेत. मतदार वाढल्याने एकूण ५३ मतदान केंद्रही वाढले आहेत. २०१७ मध्ये पालिका निवडणुकीत ७३५ मतदान केंद्रांवर मतदान झाले होते. यंदा ८७६ मतदान केंद्र निश्चित करण्यात आले असून यात १० टक्के वाढीव आहेत. अर्थात एखादवेळी एखाद्या मतदान केंद्रावर जर सुविधा नसतील, मतदारांची गैरसोय होणार असे दिसत असेल तर ते वेळेवर बदलता यावे यासाठी ही सोय आहे. अनेक प्रभागाच्या सीमा निश्चित करताना मतदार यादीत एकाच कुटुंबात अंतिम स्थानावर असलेल्या मतदारांची नावे किंवा त्याच कुटुंबात नव्याने सून म्हणून आलेल्या मतदाराचे नाव नोंदणी करण्यात आले. विधानसभा निवडणुकीत त्यांनी एकाच मतदान केंद्रावर मतदान केले. परंतु, यंदा एकाच कुटुंबातील मतदारांचे मतदान केंद्र बदलले आहे. कुटुंबातील तीन सदस्य एका मतदान केंद्रावर तर चौथा सदस्य अन्य मतदान केंद्रावर मतदान करणार आहे. त्यामुळे मतदारांमध्ये नाराजी आहे. निवडणूक यंत्रणेच्या चुकीमुळे एकाच सारंग राऊत यांच्या पत्त्यांवर २०० मतदारांचे नाव आले आहे. मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी प्राधिकृत पत्ता आवश्यक असतो. अनेकांकडे तो नसल्यामुळे एकाच प्राधिकृत पत्त्यावर २०० जणांचे नाव येण्याची चूक मतदार यादीत झाली आहे. ही चूक ज्यांनी मतदारांची नावे घेतली त्यांची आहे. या चुकीमुळे एकाच घरात अर्थात सारंग राऊत यांच्या घरात २०० मतदार वास्तव्यास आहेत, असे दिसून येते. त्याचप्रमाणे आडनावही सारंग राऊत यांच्या पुढे लावण्यात आले आहे. उदा. घोटेकर सारंग राऊत, भयाणी सारंग राऊत, भूतडा सारंग राऊत, देशमुख सारंग राऊत याप्रमाणे चूक करण्यात आली आहे. एकाच कुटुंबातील मतदारांचे मतदान केंद्र बदलले स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये मतमोजणी, तयारी पूर्ण महानगर पालिकेच्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये एकाच ठिकाणी यावेळी प्रथमच मतमोजणी होणार आहे. २०१७ च्या निवडणुकीत विविध प्रभागासाठी वेगवेगळे मतमोजणी केंद्र होते. परंतु, यावेळी सर्व २२ ही प्रभागामधील मतदानाची मतमोजणी ही नवसारी प्रभागातील महानगर पालिकेच्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्येच होणार आहे. महानगर पालिका आयुक्तांनी मंगळवार १६ रोजी या मतमोजणी केंद्राची पाहणी केली. मतमोजणी टेबलची मांडणी, उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांच्यासाठी असलेली बसण्याची व्यवस्था, माध्यम प्रतिनिधींसाठी राखीव कक्ष, स्ट्राँगरूम, ऑब्जर्व्हर रूम, वाहनतळ, मतमोजणी कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या मुलभूत सुविधांची त्यांनी माहिती घेतली. अशाप्रकारे शोधता येणार नाव, मतदार केंद्र, पत्ता गुगल प्ले स्टोअरवर जाऊन मताधिकार मोबाईल अॅप डाऊनलोड करावे लागेल. व्होटल लिस्ट सर्च हा पर्याय येतो. त्यावर क्लिक केल्यानंतर नावानुसार किंवा ईपिक क्रमांकानुसार असे दोन पर्याय दिले आहेत. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे असे विचारणारा पर्याय असून त्यात म्युनिसिपल कॉर्पोरेशन निवडायचा. नंतर जिल्ह्याची निवड करायची, त्यानंतर अमरावती हा पर्याय निवडून पूर्ण नाव किंवा ईपिक क्रमांक टाकायचा. नंतर सर्चवर क्लिक करायचे. त्यानंतर मतदान केंद्र क्रमांक, मतदान केंद्र व मतदान केंद्राचा पत्ता मिळेल. मात्र, सध्या या तिन्ही पर्यायांची माहितीच भरली नसल्याने ती अॅपवर नाही. २२ डिसेंबरपर्यंत येणार.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!