ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

निवडणुकांनंतर सुप्रिया सुळे केंद्रात, तर रोहित पवार राज्यात मंत्री:शरद पवारांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे, लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


“राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल लागताच महाराष्ट्राला एक वेगळेच चित्र पाहायला मिळेल. निवडणूक संपल्यानंतर सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होतील, तर रोहित पवार राज्याच्या मंत्रिमंडळात दिसतील. पवार कुटुंब कधीच वेगळे नव्हते आणि नाहीत, हे माझे भविष्य लवकरच खरे ठरेल,” असा खळबळजनक दावा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला आहे. ‘ अजित पवार यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करताना लक्ष्मण हाके यांनी पुण्याच्या राजकारणाकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, “एकीकडे मुखी फुले-शाहू-आंबेडकरांचे नाव घ्यायचे आणि दुसरीकडे तिकीट वाटताना बोडके, आंदेकर, नायर यांसारख्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना जवळ करायचे, हेच अजित पवारांचे राजकारण आहे. पुण्यात सत्ता आल्यावर अजित पवार पुन्हा पहाटे बाहेर पडतील, मोकळे भूखंड शोधतील आणि ते ५०० रुपयांत हडप करतील.” पवार हे भ्रष्टाचाराचे महामेरू असून ते जनतेचे सेवक नसून अदानींसारखे केवळ एक ‘उद्योजक’ असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. शरद पवारांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे शरद पवार यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करताना हाके म्हणाले, “शरद पवार वरवर भाजपसोबत जाणार नाही असे सांगत असले, तरी त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे आहेत. ते राज्यातील भाजप नेत्यांना किंमत देत नाहीत, त्यांचे थेट ‘कनेक्शन’ पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्याशी आहे.” भाजपच्या ‘गंगे’त भ्रष्टाचाराची ‘गटारगंगा’ भाजपवर टीका करताना लक्ष्मण हाके यांनी कार्यकर्त्यांच्या नाराजीचा मुद्दा मांडला. “भाजप स्वतःला कितीही पवित्र गंगा मानत असली, तरी त्यांनी अजित पवारांसारखी ‘भ्रष्ट गटारगंगा’ पक्षात मिसळून घेतली आहे. ज्या पवारांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी लोकांनी भाजपला निवडून दिले, त्याच पवारांना भाजपने सत्तेत भागीदार केले. यामुळे भाजपचा सामान्य कार्यकर्ता अस्वस्थ आणि नाराज आहे,” असे लक्ष्मण हाके म्हणालेत. राज्यात सोयीच्या युत्यांचा खेळखंडोबा सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना लक्ष्मण हाके यांनी सर्वच पक्षांच्या सोयीच्या राजकारणाचा समाचार घेतला. “सध्या भाजपची शिंदे गटाशी आणि अजित पवारांशी युती आहे. अजित पवारांचे शरद पवारांशी आतून साटेलोटे आहे. शरद पवार काँग्रेस आणि ठाकरेंसोबत आहेत. ठाकरे आणि मनसेची जवळीक आहे, तर काँग्रेस वंचितसोबत बोलणी करतेय. थोडक्यात काय, तर सर्वच पक्ष एकमेकांसोबत निवडणूक लढवत आहेत. यात सामान्य कार्यकर्ता मात्र बाजूला फेकला गेला असून, आगामी निवडणुका केवळ पैसा आणि गुंडगिरीच्या जोरावर लढल्या जातील,” अशी भीती लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर