ब्रेकिंग न्यूज
मॅट्रिमोनी साईटवर ओळख; लग्नाची स्वप्नं…महिलेला भेटायला फ्रान्समधून पुण्यात आला, पण एअरपोर्टवरच इतकं मोठं … रक्षाबंधनाच्या स्नेहधाग्यातून समाजसेवेचा संकल्प; शिवसेना उबाठाचे वणीतील कौटुंबिक स्नेहमिलन उत्साहात 7/12 उतारा WhatsApp वर कसा मिळवायचा? फक्त 3 सोप्या स्टेप्स वापरून पाहा CRIME : भेटायला बोलवून किडनॅप अन् झाडाला बांधून जिवंत जाळलं; 28 वर्षाच्या इन्स्टाग्राम रीलस्टार तरुणीचा दुर… Navnath Ban Vs Amey Ghole News | नवनाथ बन आणि अमेय घोलेंमध्ये जुंपली | News18 Marathi Anaya Bangar : ऑस्ट्रेलियाकडून संधी मिळताच अनाया बांगरने BCCI वर व्यक्त केली नाराजी! पुरूषाची स्त्री झाली प… अल्पवयीन पोरं, शिकवतो म्हणून मुंबईला आणलं अन् नरकात ढकललं, पैशांसाठी बाप आणि आत्याचं भयानक कृत्य पोलीस बांधवांना राखी बांधून महिला सुरक्षेचा दिला संदेश मराठमोळ्या सचिनच्या घरी ओणमचं सेलिब्रेशन, अख्खं तेंडुलकर कुटुंब जमलं, पण एका गेस्टने सगळ्यांचं लक्ष वेधलं! भाई का बड्डे! कुख्यात गुन्हेगार तुरुंगात, टोळीचं भयंकर कांड, कारागृहाच्या भिंतीवरच…, Video व्हायरल होताच …
SP News Maregaon

7/12 उतारा WhatsApp वर कसा मिळवायचा? फक्त 3 सोप्या स्टेप्स वापरून पाहा

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शेतकरी बांधवांसाठी आणि जमीनदारांसाठी भूमी अभिलेख विभागाने एक अत्यंत दिलासादायक निर्णय घेतला आहे. आता सातबारा (७/१२), ८-अ उतारा आणि मिळकत पत्रिका (Property Card) मिळवण्यासाठी सेतू केंद्र किंवा महा ई-सेवा केंद्रांचे खेटे मारण्याची अजिबात गरज नाही. ही सर्व महत्त्वाची कागदपत्रे आता थेट तुमच्या मोबाईलवर, म्हणजेच WhatsApp वर उपलब्ध होणार आहेत.

अनेकदा सेतू केंद्रांवर १५ रुपयांच्या उताऱ्यासाठी जास्त पैसे उकळले जायचे, तसेच तिथे तासनतास रांगेत उभे राहावे लागायचे. मात्र, आता ही संपूर्ण प्रक्रिया डिजिटल आणि पारदर्शक झाली असून, वेळ आणि पैशांची मोठी बचत होणार आहे.

महाभूमी पोर्टलला भेट द्या, सर्वात आधी महाराष्ट्र शासनाच्या महाभूमी या अधिकृत संकेतस्थळावर जा. त्यानंतर मोबाईल नंबर नोंदवा. संकेतस्थळावर जाऊन तुमचा ‘व्हॉट्सअ‍ॅप मोबाईल क्रमांक’ नोंदवा आणि केवळ १५ रुपये इतके माफक शुल्क ऑनलाईन भरा.

तिसरी आणि महत्त्वाची स्टेप थेट WhatsApp वर PDF डाउनलोड करा. नोंदणी यशस्वी होताच, तुमचा सातबारा किंवा ८-अ उतारा थेट तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपवर डिजिटल स्वरूपात पाठवला जाईल. तिथून तुम्ही तो लगेच डाउनलोड करून वापरू शकता.

दलाली आणि अतिरिक्त खर्चाला आळा: १५ रुपयांचा उतारा मिळवण्यासाठी आता केंद्रांवर अतिरिक्त पैसे मोजावे लागणार नाहीत. उतारा थेट अधिकृत प्रणालीद्वारे व्हॉट्सअ‍ॅपवर येत असल्याने बनावट प्रती किंवा उताऱ्याच्या गैरवापराची शक्यता संपुष्टात येईल.

घरी बसून एका क्लिकवर दाखला मिळणार असल्याने शेतकऱ्यांचे श्रम आणि वेळ वाचेल. भूमी अभिलेख विभागातर्फे ही सुविधा सुरुवातीला काही जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येत आहे. यातील यशोगाथेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात टप्प्याटप्प्याने ही सेवा पूर्ण क्षमतेने लागू केली जाईल.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर