ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

जागतिक मृदा दिन उत्साहात साजरा

489 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

जमिनीचे आरोग्य जपण्यासाठी कृषि विभागाचे आवाहन

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव:तालुका कृषि अधिकारी कार्यालय, मारेगाव यांच्या वतीने जागतिक मृदा दिनाचे औचित्य साधत वरुड गावात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने शेतकऱ्यांना जमिनीचे पोषण, मृदा संवर्धन व संतुलित खत व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमात तालुका कृषि अधिकारी कु.दिपाली खवले यांनी मृदा दिनाचा इतिहास, उद्देश आणि महत्व यावर माहिती देत संतुलित खतांचा वापर, जमिनीचे योजनेपूर्वक व्यवस्थापन आणि जमिनीच्या आरोग्य जतनाचे महत्त्व पटवून दिले.

मंडळ कृषि अधिकारी किशोर डोंगरकार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे वाढते महत्व स्पष्ट केले. सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी आवश्यक उपाययोजना, शेणखत-हिरवेखताचा वापर आणि पिकपद्धतीतील विविधता यावर त्यांनी मार्गदर्शन केले.

सहायक कृषि अधिकारी सचिन आत्राम यांनी शेतकऱ्यांना माती नमुना घेण्याची योग्य पद्धत तसेच ‘जमीन आरोग्यपत्रिका’ कशी समजून घ्यावी याबाबत सविस्तर माहिती दिली. तर सहायक कृषि अधिकारी निखिल पवार यांनी कृषि विभागाच्या विविध शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली.

या कार्यक्रमात शेतकऱ्यांना त्यांच्या जमीन आरोग्यपत्रिकांचे वाटप करण्यात आले. गावातील कृषि सखी मनीषा टोंगे आणि कृषि ताई काजल बट यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन व समन्वय साधला. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर