ब्रेकिंग न्यूज
⚡ MPSC Exam : अर्ज कसा करायचा? किती मुदतवाढ? परीक्षेच्या तारखेतही बदल, MPSC परीक्षेसंर्भात A to Z माहिती ✦ ⚡ दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मारेगाव पोलिसांचा ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’वर बडगा; धडक मोहीम सुरू! ✦ ⚡ IND vs NZ 2nd ODI : पावसाची रिमझिम पण टॉस जिंकून टीम इंडियाची बॉलिंग, सिराजला ‘नो एन्ट्री’, पाहा दोन्ही संघ… ✦ ⚡ Success Story : शेतात लावली 350 झाडी, सोलापूरच्या शेतकऱ्याला 7 लाख निव्वळ नफा, असं काय केलं? ✦ ⚡ पाच मुलांचा बाप, विधवा महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, नको ते केलं अन् शेवट भयंकर, छ. संभाजीनगरच्या घटनेनं… ✦ ⚡ Government Employees News | सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार, सणासाठी मिळणार 20 हजार रुपये ✦ ⚡ 61 तासांच्या संघर्षानंतर अखेर तोडगा! राजू शेट्टींची मोठी घोषणा, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना किती रुपये मिळणार? ✦ ⚡ बंद फ्लॅट हेरले, कटरने कड्या कापल्या अन् एकाच रात्रीत…, छ. संभाजीनगरात चोरट्यांचा धुमाकूळ ✦ ⚡ हॉटेलमध्ये जेवन केलं, बाहेर येताच काळानं गिळलं, मित्राला वाचवायला गेला अन्…, सांगलीत हळहळ ✦ ⚡ एल निनोच्या संभाव्य संकटावर मात करण्यासाठी धामणीत वनराई बंधाऱ्याची उभारणी!
SP News Maregaon

Success Story : शेतात लावली 350 झाडी, सोलापूरच्या शेतकऱ्याला 7 लाख निव्वळ नफा, असं काय केलं?

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सोलापूर : सततचा दुष्काळ आणि पाण्याचा तुटवडा यावर मात करत सांगोला तालुक्यातील चिक महूद येथील शेतकरी नवनाथ पांडुरंग महानवर यांनी ॲपल बोराच्या शेतीतून उत्पन्नाचा नवा आदर्श निर्माण केला आहे. पाण्याचे योग्य नियोजन आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी अवघ्या एका एकरात ॲपल बोराची बाग यशस्वीरीत्या फुलवली आहे. यामधून त्यांना लाखोंची कमाई होत आहे.

नवनाथ महानवर यांनी लागवडीपूर्वी जमिनीची योग्य मशागत करून झाडांची छाटणी केली. त्यानंतर 16 बाय 10 फूट अंतरावर एका एकरात ॲपल बोराची 350 रोपे लावली. दुष्काळी परिस्थिती विचारात घेऊन त्यांनी झाडांना दररोज केवळ दोन ते तीन तास ठिबकद्वारे पाण्याचे काटेकोर नियोजन केले. तसेच रोपांवर रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून वेळोवेळी औषध फवारणी करून बागेचे उत्तम संगोपन केले.

गेल्या दोन वर्षांपासून ते ही शेती करत असून बागेवर आतापर्यंत दीड ते अडीच लाख रुपयांचा खर्च झाला आहे. मागील वर्षी सर्व खर्च वजा करून त्यांना 5 लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. ॲपल बोराचा हंगाम साधारण तीन महिने चालतो.

सध्या बाजारात ॲपल बोराला सरासरी 50 ते 60 रुपये प्रति किलो असा चांगला दर मिळत आहे. या हंगामात अवघ्या तीन तोड्यांमध्येच महानवर यांना सव्वा लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. अजून तीन महिने तोडणी सुरू राहणार असून, या वर्षाच्या हंगामातून आणखी 6 ते 7 लाख रुपयांचे उत्पन्न मिळण्याची आशा त्यांनी व्यक्त केली आहे. योग्य नियोजन, चिकाटी आणि कष्टाच्या जोरावर दुष्काळी भागातही शेतीतून उत्तम उत्पन्न घेता येते, हे नवनाथ महानवर यांनी सिद्ध करून दाखवले आहे.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर