ब्रेकिंग न्यूज
⚡ शेताच्या बांधावरून थेट रुपेरी पडद्यावर! वेगावच्या अजय बदकी यांची ‘हुंकार’मधून दमदार एन्ट्री! ✦ ⚡ दुष्काळात बीडच्या शेतकऱ्यानं करून दाखवलं, 500 रुपयांच्या खर्चात मिळवलं तब्बल 32 क्विंटल सोयाबीनचे उत्पादन, … ✦ ⚡ लेकीच्या सुखासाठी कर्ज काढलं, पण जावई निघाला…, लग्नानंतर 4 महिन्यांत सगळं संपलं, संजनाचा आईला शेवटचा फोन … ✦ ⚡ Pawanraje Nimbalkar Murder Case : पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाला नवं वळण! पद्मसिंह पाटलांचा पाय खोलात? CB… ✦ ⚡ CRIME : फेसबूक LIVE सुरू असताना थरारक हत्याकांड! मेडिकल स्टोअरबाहेर पेटला वाद अन् ‘स्टिंग ऑपरेशन’ करताना झा… ✦ ⚡ Success Story : शेती करावी तर अशी, तीन पिकातून बीडच्या शेतकऱ्याचं पालटलं नशीब, वर्षाला 8 लाख कमाई, Video ✦ ⚡ IAS Tukaram Mundhe : MPSC चौकशी समितीवर नियुक्ती अन् FDA मधून बदलीची चर्चा; अखेर तुकाराम मुंढेंनी मौन सोडलं… ✦ ⚡ शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! कर्जमाफीच्या तिसऱ्या यादीत नाव असेल तर लगेच करा हे काम ✦ ⚡ Kolhapur Crime: एकत्रच जीव देणार होतो पण…, प्रियकराचा शॉकिंग खुलासा, कोल्हापूरला हादरवणाऱ्या प्रकरणात नेम… ✦ ⚡ Dhruv Rathee : मॅकेनिकल इंजीनियरिंग ते जर्मनीत उच्च शिक्षण! पाहा कसा आहे ध्रुव राठीचा शैक्षणिक प्रवास
SP News Maregaon

CRIME : भेटायला बोलवून किडनॅप अन् झाडाला बांधून जिवंत जाळलं; 28 वर्षाच्या इन्स्टाग्राम रीलस्टार तरुणीचा दुर…

6 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


Influencer Manjit Kaur Murder Case : पुण्यातील माधवी कुंभार या रीलस्टारविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर आता अनेक इन्फ्लुएंसरचे गुन्हेगारीतील प्रकरणं समोर येत आहे. अशातच आता सोशल मीडियाच्या दुनियेत आपली ओळख निर्माण करणाऱ्या 28 वर्षीय इन्फ्लुएंसर मनजीत कौर हिची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. मनजीतला भेटायला बोलवल्यानंतर तीचं अपहरण करण्यात आलं होतं. तसेच जंगलात नेऊन तिला झाडाला बांधून जाळण्यात आलं होतं. अशातच आता तिचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे.
दोन महिने उपचार, 26 ऑगस्ट रोजी मृत्यू
गंभीर भाजलेल्या मनजीतवर ‘पोस्टग्रेज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च’ रुग्णालयात उपचार सुरू असताना 26 ऑगस्ट रोजी मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांवर अनेक प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे. कारण घटनेच्या तब्बल दोन महिन्यांनंतर मनजीतच्या आईच्या तक्रारीवरून चंदीगड पोलिसांनी दोन संशयितांविरुद्ध अपहरण आणि हत्येचा गुन्हा दाखल केला.

Hingoli Crime : खाकी वर्दीत पोलीस उपनिरीक्षकाने आयुष्य संपवलं; समोरून ट्रेन आली अन् सेकंदाचाही विचार न करता मारली उडी! कारण काय?
झाडाला बांधून पेटवून दिलं
3 जुलै आणि 4 जुलैच्या मध्यरात्री मनजीतच्या दोन ओळखीच्या व्यक्तींनी तिला चंदीगडच्या सेक्टर 34 मध्ये भेटायला बोलावलं होतं. तिथं तिच्यावर हल्ला करून तिला बळजबरीनं गाडीत बसवलं आणि मोरिंडाच्या जंगलात नेलं. तिथं तिला एका झाडाला बांधून पेटवून दिलं आणि आरोपी पसार झाले. यानंतर तिच्या एका व्यक्तीने घटनास्थळी पोहोचून ब्लँकेटच्या साहाय्याने आग विझवली. त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं.
पोलिसांनी जबाब घेतला नाही
रीलस्टार तरुणीला शुद्धीवर आल्यावर तिने कुटुंबाला संपूर्ण कहाणी सांगितली. मात्र, त्यावेळी खरड पोलिसांनी तिचा जबाब घेतला नाहीत, असा आरोप कुटूंबियांकडून करण्यात आला आहे. मनजीत कौरच्या आई कांता देवी यांनी सांगितले की, मुलीच्या ओळखीच्या शुभी आणि पिंदा यांनी फोन करून बोलवलं होतं. सुमारे दोन महिने वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार करूनही मनजीतच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. 26 ऑगस्ट रोजी अखेर तिने श्वास सोडला.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर